Farmer Crop Insurance: पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रारंभ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Farmer Crop Insurance
Farmer Crop Insurancepudhari
Published on
Updated on

Farmer Crop Insurance Money

नायगाव, प्रतिनिधी :

नांदेड जिल्ह्यातील तसेच नायगाव तालुक्यातील बरबडा, घुंगराळा, नरसी या महसूल मंडळांसह जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकरी पीकविमा लाभापासून वंचित होते. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. दत्ता भरणे, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच संबंधित पीकविमा कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला होता.

Farmer Crop Insurance
Crop Insurance Nanded | उमरी तालुक्यातील ३२ गावांतील शेतकरी अद्याप पीकविम्यापासून वंचित

या पाठपुराव्याची दखल घेत कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी कृषी विभाग, जिल्हाधिकारी आणि पीकविमा कंपनीला वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा लाभ देण्याबाबत आवश्यक निर्देश दिले. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीकविमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Farmer Crop Insurance
Crop Insurance News : किनवट, कंधारमधील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

सावरखेड, रुई, वंजारवाडी, घुंगराळा, हिप्परगा, पाटोदा, बरबडा, आंतरगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा झाल्याची माहिती वसंत सुगावे पाटील यांना दिली. तसेच, पीकविमा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी वसंत सुगावे पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Farmer Crop Insurance
Crop Insurance : मृग नक्षत्र उजाडले तरी गतवर्षीची पीक विमा भरपाई नाही

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली पीकविमा रक्कम मिळू लागल्याने संबंधित गावांतील शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news