

Drone spraying machine arrives in Tembhi village
सारखणी, पुढारी वृत्तसेवा किनवट-माहूर तालुक्यात पहिल्यांदाच टेंभी गावात ड्रोन फवारणी यंत्र शेतकरी कौतुक मुनेश्वर यांनी आणला असून, कमी खर्चात, कमी वेळात आणि कमी श्रमात आता शेतकऱ्यांचे काम होणार आहे. या ड्रोनच्या डेमो आणि उद्घाटनप्रसंगी माजी जिल्हा उपाध्यक्ष समाधान जाधव, बंडूजी नाईक, प्रकाश कुडमुते, अड. राहुल नाईक, लक्ष्मण कनाके, धीरज नाईक, सिद्धार्थ मुनेश्वर, अनिल गुंजकर, एस.पी. बोंदरवाड, डी.टी. खूपसे, नाविद खान यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
ड्रोन फवारणी यंत्र टेंभी गावात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता कमी खर्चात कमी वेळात आणि कमी श्रमात जास्त शेतकऱ्याचे काम होणार आहे. दहा लिटर कीटकनाशक आणि पाणी या फवारणी यंत्रामध्ये बसते. त्यामध्ये एक एकर फवारणी होणार आहे. एक एकरासाठी दीडशे ते २०० लिटर पाण्याऐवजी फक्त दहा लिटर पाण्यामध्ये काम होणार तसेच २०० एम.एल. एका एकरामध्ये कीटकनाशक लागत असेल तर फक्त ७० टक्केमध्येच एक एकर होणार.
हे आहेत फायदे...
कमी वेळात मोठ्या क्षेत्रावर फवारणी
शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार
रसायनांचा योग्य वापर
मजुरांवरील खर्च कमी
कमी प्रमाणात पाणी वापरून प्रभावी फवारणी
पिकांच्या आरोग्याचे अचूक निरीक्षण
पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही सुधारणार
विषबाधेपासून शेतकऱ्यांचे संरक्षण