CT scan MRI facility : डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅन व एमआरआयची सुविधा

आता हजारो रुग्णांना मिळणार दिलासा
CT scan MRI facility government hospital
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅन व एमआरआयची सुविधाpudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आता सिटीस्कॅन आणि एमआरआय तपासण्या होणार आहेत. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री अतुले सावे यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठी सोय होणार आहे.

शासकीय रुग्णालयात नांदेडसह शेजारीत पाच ते सहा जिल्ह्यांतून उपचारासाठी रुग्ण येतात. परंतु शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅन आणि एमआरआय तपासणीची सुविधा नसल्यामुळे या रुग्णांना खासगी रुग्णालयात तपासण्या कराव्या लागत होते. त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत होते. त्यात आता राज्यात नऊ ठिकाणी पीपीपी तत्त्वावर सिटीस्कॅन आणि एमआरआय मशीन शासकीय रुग्णालयांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यात नांदेडचाही समावेश होता.

CT scan MRI facility government hospital
Pune Hadapsar rail issue : पुणेऐवजी हडपसर स्थानकावरच गाड्या टर्मिनेटच्या निर्णयावर मध्य रेल्वे ठाम

परिणामी आता शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना माफक दरात या तपासण्या करून घेता येईल. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.

CT scan MRI facility government hospital
Latur News : गुरुजी निवडणूक प्रशिक्षणाला, सरपंचांनी भरविली शाळा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news