नांदेड, लातूरमध्ये डीआयजी पथकाचे छापे

८ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
DIG team raids in Nanded and Latur
नांदेड, लातूरमध्ये डीआयजी पथकाचे छापेfile photo
Published on
Updated on

DIG team raids in Nanded and Latur

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: नांदेड परिक्षेत्रात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी विशेष मोहीम उघडली आहे. त्यांच्या विशेष पथकाने नांदेड आणि लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई करत एका तरुणाकडून गावठी पिस्टल आणि ३९ जिवंत काडतुसे जप्त केली. तसेच दोन ठिकाणी जुगार अड्यांवर छापा टाकून एकूण ३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

DIG team raids in Nanded and Latur
खा. शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य !

पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड यांनी नांदेड शहरातील इतवारा भागात सापळा लावून जयकिशन उर्फ जय राजेसिंह ठाकूर (वय २१, रा. उल्हासनगर, तरोडा नाका) याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ३ जिवंत काडतुसांसह एक गावठी पिस्टल आढळून आली. ही शस्त्रे त्याने कशासाठी आणली होती, याचा तपास पोलीस करत आहेत.

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा दणका

पथकाने दुसरी कारवाई नांदेडच्याच मच्छी मार्केट भागातील जुगार अड्ड्यावर केली. येथे २५ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून २ लाख ३४ हजार रोख आणि ४ लाख २८ हजार रुपये किमतीचे २७ मोबाईल जप्त केले. तर तिसरी कारवाई लातूर उदगीर जिल्ह्यातील येथील नाईक चौकात करण्यात आली.

DIG team raids in Nanded and Latur
Nanded Engineer Death |नायगावात बांधकाम उपविभाग कार्यालयात उपअभियंत्याने घेतला गळफास

तेथे रमेश गिरी यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून १ लाख ५ हजार रोख आणि ७० हजार रुपये किमतीचे १२ मोबाईल जप्त केले. या कारवाईत एकूण १३ जणांवर उदगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीआयजी शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीराम माचेवाड, प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी, विलास सुरवसे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news