Nanded Engineer Death |नायगावात बांधकाम उपविभाग कार्यालयात उपअभियंत्याने घेतला गळफास

कार्यालयासमोर अज्ञात दुचाकी धुळखात पडलेली दिसून आल्याने संशय बळावला
Naigaon PWD Sub Engineer Death
विलास बोलूरेPudhari
Published on
Updated on

Naigaon PWD Sub Engineer Death

नायगाव : नायगाव शहरातील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात शनिवारी (दि. ३१) एक खळबळजनक व हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली. जुन्या पंचायत समिती इमारतीत असलेल्या या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर विलास बोलूरे यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

विलास बोलूरे हे लोहा तालुक्यातील लांडगेवाडी येथील रहिवासी असून सध्या नायगाव शहरात वास्तव्यास होते. सकाळच्या सुमारास कार्यालयाच्या खालच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावलेले असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्याचवेळी कार्यालयासमोर एक अज्ञात दुचाकी धुळखात पडलेली दिसून आल्याने संशय अधिकच बळावला.

Naigaon PWD Sub Engineer Death
Nanded Crime | क्षुल्लक वाद थेट डोक्यात घातली वीट, एकाचा मृत्‍यू

नागरिकांनी वरच्या मजल्याकडे पाहिले असता एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे दृश्य दिसून आले. ही बाब लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मयताचे नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास बोलूरे हे नायगाव बांधकाम विभागात सहायक अभियंता म्हणून कार्यरत होते. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांची देगलूर येथे पदोन्नती झाली होती. मात्र, सध्या ते नायगाव येथे डेप्युटेशनवर कार्यरत होते.

Naigaon PWD Sub Engineer Death
Nanded Crime : बिलोलीत नरबळीचा थरार ! गुप्तधनासाठी जमीन मालकालाच खड्ड्यात ढकलले

अधिक धक्कादायक बाब म्हणजे, शुक्रवारी कार्यालयात केवळ सेवक उपस्थित होते, तर इतर कर्मचारी गैरहजर होते. शनिवार असल्याने कार्यालय पूर्णपणे बंद होते. त्यामुळे ही घटना नेमकी कधी आणि कोणत्या परिस्थितीत घडली, याबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. घटना उघडकीस येताच नायगाव शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news