Nanded Police Inspector Transfer|पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांची तडकाफडकी बदली रद्द करा, धर्माबाद ठाण्यात आंदोलन

पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांची तडकाफडकी बदली रद्द करा, धर्माबाद ठाण्यात आंदोलन
रात्री बारा वाजेपर्यंत अंदाजे ५०० लोकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले
रात्री बारा वाजेपर्यंत अंदाजे ५०० लोकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले
Published on
Updated on

धर्माबाद: येथील पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांची तडकाफडकी बदली झाल्याचे आदेश येताच विविध संघटनेचे पदाधिकारी व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते पोलीस ठाण्यात सोमवारी दि. ३ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजल्यापासून एकत्र आले. त्यानंतर ठिय्या आंदोलन करत भडीकर यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन आणि आत्मदहन करण्याचा इशारा दिला. तसेच येत्या आठ दिवसात बदली रद्द करण्यात यावी अन्यथा १३ ऑगस्ट रोजी धर्माबाद बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे, धर्माबाद येथील पोलीस निरीक्षक भडीकर हे रुजू झाल्यापासून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परिश्रम घेत शहरातील जनतेच्या विश्वासास पात्र ठरले होते. पोलीस ठाण्यात सर्वसामान्य नागरिक सुद्धा न्याय मागण्यासाठी विश्वासाने येत होते. पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर हे दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढील कारवाही नियमानुसार करायचे तसेच ते पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले.

त्यासाठी ते विद्यार्थी प्रेमी आणि धर्माबाद मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाडे लावण्याचा उपक्रम करत. ते निसर्ग प्रेमी, प्राणी प्रेमी आहेत. त्यामुळे ते चौदा महिन्यातच तालुक्यातील जनतेच्या विश्वासास पात्र ठरले होते.

ते शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी यशस्वी झाले होते. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांनी एका राजकीय पुढाऱ्याला हाताशी धरून पोलीस निरीक्षक सदाशिव वडीकर यांची बदली केल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांनी केला आहे. अनेकांनी बदली रद्द झाली नाही तर पोलीस ठाण्यात आत्मदहन करण्याचा इशारा उप विभागीयपोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यापुढेच दिल्यामुळे वातावरणही चिघळले होते

रात्री बारा वाजेपर्यंत अंदाजे ५०० लोकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले
Nanded accident: देगावजवळ भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, तिघे थोडक्यात बचावले

रात्री बारा वाजेपर्यंत अंदाजे ५०० लोकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. पोलीस निरीक्षक सदाशिव बडीकर यांची तडकाफडकी बदली करण्याचे कारण काय आहे, हे जाहीर करावे यासह इतर मागण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच संघटना पत्रकार तसेच नागरिकांनी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती.

रात्री बारा वाजेपर्यंत अंदाजे ५०० लोकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले
Nanded Crime | पळसगाव हाणामारी प्रकरणी फरार माजी सरपंच शिवाजी शिंदे यांना अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news