Nanded Crime | पळसगाव हाणामारी प्रकरणी फरार माजी सरपंच शिवाजी शिंदे यांना अटक

शिंदे तब्बल ४५ दिवस पोलिसांना गुंगारा देत फरार, न्यायालयीन कोठडी
Arrested News
Arrested News pudhari photo
Published on
Updated on

Naigaon Palasgaon Former Sarpanch Arrested

नायगाव : पळसगाव येथील तुंबळ हाणामारी प्रकरणातील फरार आरोपी तथा माजी सरपंच शिवाजी शिंदे यांना नायगाव पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमवारी (दि.३) कनिष्ठ स्तर न्यायालय, नायगाव येथे हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यानुसार त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

पळसगाव येथे झालेल्या तुंबळ हाणामारीच्या घटनेनंतर या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर शिवाजी शिंदे हे तब्बल ४५ दिवस पोलिसांना गुंगारा देत फरार होते. दरम्यान, अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम होती.

Arrested News
Nanded crime news: देगाव फाट्यावर देशी दारूची चोरटी वाहतूक उधळली; ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

यानंतर नायगाव पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. सापळा रचून पोलिसांनी शिवाजी शिंदे यांना अखेर ताब्यात घेतले. अटकेनंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सोमवारी कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर करण्यात आले.

सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

Arrested News
Nanded crime : नांदेडमध्ये हनीट्रॅप; महिलांच्या टोळीला अटक

या प्रकरणातील आरोपीला अटक झाल्यामुळे तपासाला आता अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेशी संबंधित इतर बाबी, आरोपींची भूमिका आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलीस पुढील तपास अधिक सखोलपणे करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे पळसगाव हाणामारी प्रकरणातील पुढील घडामोडींकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news