Nanded accident : धर्माबाद येथे भीषण अपघात; दुचाकी चालक लोडिंग टारस गाडीखाली आल्याने जागीच ठार

Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

धर्माबाद : येथील समता नगर परिसरात गुरुवारी (दि. ७ ऑगस्ट) रात्री सुमारे ८:३० वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. संभाजी वाघमारे हे सम राळेकर यांच्या दुचाकीवरून (क्रमांक: AP3AJ9882) समता नगर मार्गाने जात असताना, विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोडिंग टारस गाडीखाली (क्रमांक: HR50GB3091) आल्याने हा अपघात झाला.

Accident
Nanded accident: देगावजवळ भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, तिघे थोडक्यात बचावले

या जोरदार धडकेत दुचाकी चालक संभाजी वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका जबरदस्त होता की, दुचाकी चालकाला वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

Accident
Nanded Accident | देगलूर-नांदेड महामार्गावर ट्रक - दुचाकीची धडक; तरुण जागीच ठार, एक जण गंभीर जखमी

घटनेची माहिती मिळताच धर्माबाद पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news