Nanded Crime News : नांदेडमध्ये पूर्ववैमनस्यातून दर्ग्याच्या नायब मुतवल्लींची गोळ्या झाडून हत्या

शहरातील वाघी रोडवरील घटना| दोन दुचाकींवरून आलेल्या ४ हल्लेखोरांचा थरार; चौघे पोलिसांच्या ताब्यात
 Nagpur Crime News
हॉटेल मालकाची गोळ्या झाडून हत्या, चार संशयित आरोपी फरारFile Photo
Published on
Updated on

Deputy Mutawalli of Dargah shot dead in Nanded over old enmity

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्ववैमनस्यातून एका ४१ वर्षीय व्यक्तीची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात धक्कादायक आल्याची घटना रविवारी (दि. २१) पहाटेच्या घडली. हजरत सुमारास शाह रहेमान दर्गा आणि दुल्हेशाह मस्जिदचे नायब मुतवल्ली शेख शमीम शेख इसाक असे मृत व्यक्तीचे नाव असून, या थरारक घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

 Nagpur Crime News
Robbery Case : शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, लुटमारीच्या चार घटना

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २१ जून रोजी पहाटे २:०५ ते २:१० च्या सुमारास बरकतपुरा वाघी रोडवरील अबरार फंक्शन हॉल समोर शेख शमीम हे त्यांच्या एका मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. याच वेळी दोन दुचाकीवरून चार अज्ञात हल्लेखोर अचानक तिथे आले. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी प्रथम शमीम यांच्यावर पिस्तूलने गोळी झाडली. गोळी लागून ते कोसळताच हल्लेखोरांनी तलवार आणि खंजीरने त्यांच्या पोटावर व डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात शमीम हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी शमीम यांना परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी तातडीने एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

 Nagpur Crime News
नांदेडमध्ये गँगवॉरचा भडका; तिहेरी हत्याकांडाने शहर हादरले

या प्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस करीत आहेत.

जुना वाद अन् धमक्यांचे सत्र

मयताचे भाऊ आणि तक्रारदार शेख वसीम शेख इसाक यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, दर्गा आणि मशिदीच्या व्यवस्थापनावरून आरोपींशी त्यांचा जुना वाद सुरू होता. सन २०२३ मध्ये आरोपींविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी आणि दर्याचे नायब मुतवल्लीपद सोडण्यासाठी शमीम यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. याच पूर्ववैमनस्यातून हा अत्यंत अमानुष कट रचून त्यांची हत्या करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुख्य संशयितांवर गुन्हे दाखल, ४ जण ताब्यात

या घटनेनंतर वजीराबाद पोलिसांनी तात्काळ पावले उचलत संशयित आरोपी मिर्झा शब्बर बेग, मिर्झा कलंदर बेग, मिर्झा शब्बीर बेग आणि इतर दोन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आत्तापर्यंत चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीचं कसून चौकशी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news