Marathwada crop loss survey : मराठवाड्यात पीक पंचनामे सुरु

जिल्हा प्रशासनाकडून समिती नियुक्त, तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश
Marathwada drought
Marathwada droughtpudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करीत तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी विभागीय आयुक्तालयाच्या वतीने आठही जिल्हाधिकार्‍यांना पंचनामे सुरू करण्याचे आदेशित करण्यात आले असून त्यानुसार जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना प्रथम काळ (ट्रिगर-१) नुसार पंचनामे सुरू करण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार बुधवारपासून विभागात पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे.

सर्वात कमी पाऊस हा मराठवाडा विभागात बरसला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यापर्यंतच्या सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ ६६ टक्केच हजेरी लागली आहे. त्याचा फटका हा विभागातील खरीप हंगामाला बसला आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून शासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार मराठवाड्यातील ७६ पैकी ७४ तालुक्यांमध्ये ट्रिगर -१ लागू करून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उपाययोजना उपलब्ध करून देण्याचे निर्देश यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी शासन आदेशप्रमाणे सर्व जिल्हाधिकाऱ्याना पंचनामे सुरू करून तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Marathwada drought
Vidarbha Rainfall deficit : १८ वर्षांत प्रथमच विदर्भात अल्पवृष्टी, ११ जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट

निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही देणार मदत

मुंबई : दुष्काळाच्या निकषात न बसलेल्या तालुक्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘ट्रिगर-१’ आणि ‘ट्रिगर-२’मधील निकषातही न बसणार्‍या तालुक्यांना ‘प्रत्यक्ष पाहणी’ करून मदत देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पिके करपली किंवा नुकसान झाले असतानाही केवळ निकषात बसत नाही म्हणून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. पिकांची करपलेली अवस्था प्रत्यक्ष पाहून दुष्काळाचे सर्व लाभ देण्याचा निर्णय घेतल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

असे आहेत आदेश

पंचनामे विहित नमुन्यात करावे, पंचनामे करताना गावातील ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी यांचा समावेश असावा, पंचनामे केलेल्या क्षेत्राचे प्रत्यक्ष स्थिती दर्शविणारे छायाचित्र तसेच जीपीएस को ऑर्डिनेट्स अनिवार्य आहे. बाधित क्षेत्राची तालुकानिहाय, गावनिहाय, आकडेवारी एकत्रित सादर करावी, पंचनामे, छायाचित्र विहित नमुन्यात द्यावा, पंचनाम्यात एकही बाधित क्षेत्र वगळू नये.

Marathwada drought
Gujarat Drug Bust 2026: अरबी समुद्रात मोठी कारवाई ५ पाकिस्तान्यांसह तब्बल ३००० कोटींचे अंमली पदार्थ जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news