Nanded Heavy Rain : राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे प्रयत्न

संदीप देशमुख यांच्या पत्राची त्वरेने दखल
Nanded Heavy Rain
Nanded Heavy Rain : राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे प्रयत्न File Photo
Published on
Updated on

Congress state president's efforts for Rahul Gandhi's maharashtra visit

संजीव कुळकर्णी

नांदेड : नांदेडसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विर-रोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नांदेडमधील कार्यकत्यनि लक्ष वेधल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या कार्यकत्यांचे कौतुक केले. खा. गांधी यांनी तातडीने मराठवाडयाचा दौरा आखावा, असे आम्हीही त्यांना कळविले असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

Nanded Heavy Rain
Isapur Sanctuary | इसापूर अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनासाठी ४६ कोटींचा निधी मंजूर; २२० हेक्टर भूसंपादन होणार

नांदेड-परभणी आणि हिंगोली या एकमेकांस लागू असलेल्या तीन जिल्ह्यांतील जलप्रलयामुळे शेती, पिके आणि शेतकऱ्यांची दैना झाली असून या तीन जिल्ह्यांतील गंभीर परिस्थिती पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण व इतर पाच जणांची समिती गठीत केली आहे.

वरील समितीच्या नियुक्तीची प्रक्रिया काँग्रेसच्या राज्य मुख्यालयात मंगळवारी सुरू असताना नांदेडजवळच्या बारह येथील संदीपकुमार देशमुख यांनी खा. गांधी यांना इंग्रजीतून सविस्तर पत्र पाठविल्याची बाब 'दै. पुढारी'ने सर्वप्रथम समोर आणली. त्यानंतर राज्यातील भाजपाच्या एका मंत्र्यांकडील विशेष कार्य अधिकाऱ्याने देशमुख यांच्या समयसूचकतेचे कौतुक केले.

Nanded Heavy Rain
Nanded Rain : नांदेडमध्ये 'गोदावरी'चे पात्र फुगले; नदीकाठच्या भागांत पाणी पसरले !

मागील दीड महिन्यांपासून पाऊस आणि पुराने हाहाकार माजविल्यानंतर शासनाने आधी नदिड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांसाठी प्रचलित धोरणानुसार मदत (भरपाई) जाहीर केली. त्यानंतर २३ तारखेला इतर जिल्ह्यांसाठीच्या मदतीचा शासन निर्णय जारी झाला, तरी त्यावर कोणीही समाधानी नाही. भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही येथे दिली असली, तरी राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती तशी नसल्याचे दुसऱ्या बाजूने सांगितले जात आहे.

राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे शासनाला वाढीव किंवा अतिरिक्त मदत करता आली नसावी, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. संकटाच्या काळात केंद्र सरकारने आपल्या या 'लाडक्या' राज्याला आर्थिक मदत करू नये, हे खेदजनक असल्याचे मत खा. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नांदेड आणि मराठवाड्यातील एकंदर स्थितीची माहिती वेगवेगळ्या माध्यमांतून घेतली असून ते अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा ठरवत होतेच; पण आता खा. राहुल गांधी यांनी दौरा करावा अशी सूचना खालच्या स्तरावरून आल्यानंतर त्यात आता सपकाळ यांनी पुढाकार घेतला आहे.

खा. राहुल गांधी यांनी एक दिवसाचा दौरा केला, तरी डोळे मिटून बसलेल्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्र व मराठवाड्यासाठी काही तरी जाहीर करावे लागेल, असे सत्ताधारी गोटातच बोलले जात आहे.

काँग्रेसची समिती

नांदेड व शेजारच्या दोन जिल्ह्यांसाठी प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेल्या समितीत आधी पाच जणांचा समावेश होता; पण प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी नंतर त्यात संदीपकुमार देशमुख यांचे नाव समाविष्ट केले. या समितीत तुकाराम रेंगे पाटील, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, बाळासाहेब देशमुख, प्रा. यशपाल भिंगे यांबा समावेश असून खा. रवींद्र चव्हाण हे समितीप्रमुख आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news