

Participate seriously in the SIR campaign: MP Chavan
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाची विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम सुरु झाली आहे. आपल्या हक्काच्या मतदारांचे नावे मतदार यादीतून वगळले जाऊ नयेत याची काळजी घेण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या बीएलए यांनी जागरूक राहून एसआयआर मोहिमेत गांभीर्यान सहभागी व्हावे असे आवहान खा. रवींद्र चव्हाण यांनी केले.
नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व काँग्रेस बीएलए, ब्लाँक अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांची एसआयआर संदर्भात माहिती व प्रशिक्षण शिबिर रविवार (ता. २८) रोजी काँग्रेस कार्यालयात संपन्न जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष तथा उत्तर विधानसभा बीएलए प्रमुख अब्दुल गफ्फार, नांदेड दक्षिण विधानसभा बीएलए प्रमुख श्रीनिवास मोरे उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षक विवेक जाधव यांनी एसआरआय संदर्भात डीजीटल स्क्रीनवर माहिती व प्रशिक्षण दिले. दरम्यान यावेळी मधूकर दिघे, निरंजन पावडे, आनंदराव गुंडीले, नगरसेवक मुन्ना अब्बास, सत्यपाल सावंत, फारूक भाई, सुरेश हाटकर, बापूसाहेब पाटील, संजय वाघमारे, नागराज सुलगेकर, दीपकसिंग हुजुरीया, रमेश चित्ते, शंकर शिंदे, आंबादास रातोळे, ज्योती कदम, नसिम पठाण, सुरेखा वैद्य, कदम ताई, गगन यादव, किरण पडलवार, गणेश कोकाटे, प्रबुद्ध चित्ते, मुख्तार शेख, गौतम सिरसाट, अक्षय नळगे, विनोद कांचनगिरे, प्रसेनजित वाघमारे, अझर शेख, प्रकाश दिपके, कलिम शेख, नईम शेख, एसपी कुभरि, आदीसह इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.