Bribe Case: 46 दिवसांची रजा मंजूर व्हावी यासाठी किती लाच द्यावी लागते? नांदेडच्या शिक्षकाकडून पैसे घेणाऱ्यास अटक

Naded News: नांदेमध्ये एसीबीची कारवाई : पैसे घेताना पथकाने रंगेहाथ पकडले, शिक्षण क्षेत्रात खळबळ
Bribe Case
Bribe CasePudhari
Published on
Updated on

Center head took a bribe of Rs 3,000 from a teacher to approve leave

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : तक्रारदाराची ४६ दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यासाठी लसिनगाव (ता. लोहा) जिल्हा परिषद शाळेतील केंद्र प्रमुखाला ३ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. दिगांबर रामचंद्र शिंदे (५७) असे संशयिताचे नाव असून, ते लिसनगाव जि.प. शाळेत केंद्र प्रमुख आहेत. सध्या त्यांची नेमणूक लोहा गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली आहे.

Bribe Case
HSC Exam Copy Case | मुखेड येथे बारावीच्या परीक्षेत कॉपी; विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

याविषयी अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे २०१८ पासून भाद्रा (ता. लोहा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या खासगी कारणास्तव दि. ९ फेब्रुवारी रोजी (४६) दिवसांची अर्जित रजा मंजूर होण्याकरिता लोहा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज दिला होता.

याठिकाणी लिसनगाव जि. प. शाळेचे केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे हे पंचायत समिती लोहा कार्यालयाचे आस्थापना विभागामध्ये लिपिकाचे काम तसेच गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांचे सर्व कार्यालयीन कामे पाहतात. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांची अर्जित रजा मंजूर झाली की नाही? हे पाहण्यासाठी लोहा पं. स. कार्यालय येथे जाऊन केंद्र प्रमुख शिंदे यांची भेट घेऊन विचारणा केली.

Bribe Case
Bear Attack Nanded | दयाळ धानोरा अस्वल हल्ल्यातील आणखी एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

तेव्हा शिंदे यांनी तक्रारदार यांना अर्जित रजा मंजूर करण्यासाठी स्वतःसाठी व गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांच्यासाठी ४ हजार रुपये द्यावे लागतील, पैसे दिले तरच तुमची अर्जित रजा मंजूर होईल, असे म्हणून तक्रारदार यांना लाचेची मागणी केली आहे. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली.

पडताळणीतही ही बाब समोर आली. एसीबीच्या पथकाने १६ रोजी लोहा पंचायत समिती कार्यालयात सापळा रचून तडजोडी अंती केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे यास तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. संशयित आरोपी शिंदे यास एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून, लोहा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news