HSC Exam Copy Case | मुखेड येथे बारावीच्या परीक्षेत कॉपी; विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

Nanded News | मुखेड महात्मा ज्योतिराव फुले महाविद्यालयात भरारी पथकाची कारवाई
Mukhed HSC exam copy case
Mukhed HSC exam copy case Pudhari
Published on
Updated on

Mukhed HSC exam copy case

मुखेड : शहरातील महात्मा ज्योतिराव फुले महाविद्यालय, मुखेड येथे सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याविरुद्ध कॉपीप्रकरणी आज (दि.१६) कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह परिसरात खळबळ उडाली आहे.

आज दुपारी भौतिकशास्त्राचा पेपर सुरू असताना सुमारे एक वाजण्याच्या सुमारास भरारी पथकाने परीक्षा केंद्र क्र. 0237, हॉल क्र. 4 मध्ये तपासणी केली. तपासणीदरम्यान एका परीक्षार्थ्याकडे कॉपी साहित्य आढळून आले. संबंधित साहित्यामधील मजकूर जशास तसा उत्तरपत्रिकेत लिहिलेला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विद्यार्थ्याविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Mukhed HSC exam copy case
Nanded News | UDID प्रमाणपत्रासाठी प्रतीक्षेत असलेल्या दिव्यांगांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

या कारवाईत भरारी पथक प्रमुख तथा तहसीलदार राजेश जाधव, महसूल सहाय्यक संदीप भुरे, ग्राम महसूल अधिकारी संतोष देशमुख, श्रीमती रविना लुंगारे व गणेश बंडे सहभागी होते. तसेच बैठे पथकातील मुक्रमाबाद मंडळ अधिकारी माधव पांचाळ आणि अशितोष मॅनेवार यांनीही सहभाग नोंदविला.

बारावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी या उद्देशाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या निर्देशानुसार तसेच उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर महसूल व शिक्षण विभागाची संयुक्त पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news