Nanded News: सख्ख्या भावानेच मारला घरात डल्ला; ४२ हजारांची चांदीची भांडी लंपास

उमरखेड शहरातील ट्रॅक्टर कंपनीचे विक्रेते उपचारासाठी नांदेड येथे गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी पेटीत ठेवलेली चांदीची भांडी लंपास करण्यात आली.
theft
theftFile Photo
Published on: 
Updated on: 

उमरखेड : शहरातील लोकमान्य टिळक वॉर्डातील ट्रॅक्टर कंपनीचे विक्रेते उपचारासाठी नांदेड येथे गेले असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी पेटीत ठेवलेली चांदीची भांडी लंपास करण्यात आली. या चोरीप्रकरणी सख्ख्या भावाविरुद्ध उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीला गेलेल्या चांदीच्या वस्तूंची किंमत ४२ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक वॉर्डातील सचिन भास्करराव देशपांडे (वय ५०) हे ट्रॅक्टर कंपनीचे विक्रेते असून उपचारासाठी नांदेड येथे गेले होते. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान त्यांच्या अनुपस्थितीत घरातील दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडून चोरी करण्यात आली.

theft
Nanded Crime| कर्जबाजारीपणाला कंटाळून मनाठा येथील शेतकऱ्याने संपविले जीवन

उपचार घेऊन सचिन देशपांडे घरी परतल्यानंतर त्यांना बेडरूम उघड्या अवस्थेत आढळली. त्यांनी घरातील सामानाची पाहणी केली असता लोखंडी पेटीत ठेवलेली चांदीची भांडी गायब असल्याचे निदर्शनास आले. या चांदीच्या वस्तूंची किंमत ४२ हजार ५०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घरात सर्वत्र शोध घेऊनही चांदीच्या वस्तू मिळून न आल्याने सचिन देशपांडे यांनी शेजारी राहणारा त्यांचा लहान भाऊ प्रविण भास्करराव देशपांडे (वय ४०) याच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी, ‘तुझ्या घरामध्ये मीच चोरी केली आहे, तुझ्याने जे होते ते करून घे,’ असे त्याने म्हटल्याचे फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश बोंबले करीत आहेत.

theft
Illegal Sand Mining Nanded : तीन हायवा ट्रकांसह १ कोटी २० लाखांची अवैध रेती जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.