Nanded Crime| कर्जबाजारीपणाला कंटाळून मनाठा येथील शेतकऱ्याने संपविले जीवन

पोलीस आरोग्य प्रशासनाचा तालमेल बिघडल्याने शवविच्छेदनास विलंब
Nanded Crime News
कर्जबाजारीपणाला कंटाळून मनाठा येथील शेतकऱ्याने संपविले जीवन
Published on: 
Updated on: 

हदगाव : सततची नापिकी आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे तणावाखाली असलेल्या हदगाव तालुक्यातील मनाठा येथील एका अल्पभुधारक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलीस आणि आरोग्य प्रशासनाच्या बेपर्वा कारभारामुळे मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी तब्बल दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत प्रतीक्षा करावी लागल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मनाठा येथील अल्पभुधारक शेतकरी हारी भीमराव नरवाडे हे सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळले होते. त्यांची पत्नी व मुलगा दिवाळीनिमित्त गावाबाहेर गेले होते, घरी कोणी नसताना शुक्रवारी (दि.६) दुपारी ३ च्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच मनाठा पोलीस ठाण्याचे जमादार सोनटक्के व राठोड यांनी तातडीने घटनास्थळास भेट दिली. मृताचे भाऊ विकास भीमराव नरवाडे यांच्या फिर्यादीवरून मनाठा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.