

B. R. Kadam participates in MP Ashok Chavan's inspection tour
विशेष प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्याचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या प्रभावक्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते बी. आर. कदम यांना ५ वर्षांहून अधिक काळ आपल्या प्रभावळीतून बाजूला सारलं होतं. पण गेल्या महिन्यात चव्हाण यांनी बी. आर. आणि त्यांच्या मुलाला भाजपात प्रवेश दिल्यानंतर चव्हाण-कदम यांचं जमलं, असे दृश्य बुधवार-गुरुवारदरम्यान दिसले.
चव्हाण आता राज्यसभेचे खासदार असले, तरी आपल्या परंपरागत भोकर विधानसभा मतदारसंघावर त्यांचे संपूर्ण लक्ष असून मृग नक्षत्राच्या पहिल्या जोरदार पावसाचा सर्वाधिक तडाखा त्यांच्या याच मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यातल्या बागायती पट्टघाला बसला. वादळ वाऱ्यामुळे उध्वस्त झालेल्या केळीच्या बागांची खा. चव्हाण यांनी गुरुवारी सकाळपासून पाहणी सुरू केली.
या दौऱ्यात बी. आर. कदम हेही त्यांच्यासोबत चिखल तुडवत चालताना दिसले. त्यातून 'तुमचं आमचं जमलं..!' हे चित्र कार्यकर्त्यांना बघायला मिळाले,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गेल्या महिन्यातील नदिड दौऱ्यात झालेल्या जाहीर सभेत खा. चव्हाण यांनी बी. आर. कदम यांच्यासह माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांचा भाजपा प्रवेश घडवून आणला.
त्याआधी चव्हाण यांनी कदम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना आपल्यासोबत येण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव मान्य करत कदम यांनी काँग्रेस पक्ष सोडला. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मागचे सारे काही विसरून कदम सक्रिय झाल्याचे दिसून आले. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस नांदेड विमानतळावर आले तेव्हा त्यांच्या भेटीसाठी कदम यांच्या प्रवेशपत्राची व्यवस्था चव्हाण यांच्या यंत्रणेने केली होती.
खा. चव्हाण बुधवारी सायंकाळी पुणे नांदेड विमानाने नदिडमध्ये दाखल झाले, विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी अन्य कार्यकत्यांसोबत बी. आर. कदमही हजर होते. तत्पूर्वी मागील दोन दिवसांत कदम यांनी अर्धापूर तालुक्यातील अनेक बाधित गावांना भेटी देत पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. खा. चव्हाण यांचा पाहणी दौरा गुरुवारी सकाळपासून सुरू झाला. त्यातही कदम सहभागी झाले.
कदम यांनी भाजपात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना नेमके काय आश्वासन देण्यात आले, ते समोर आलेले नाही; पण भाजपाला नवे प्रदे शाध्यक्ष मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकारिणीत कदम यांच्यावर त्यांच्या अनुभवाला साजेल अशी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
खा. चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील उमरी, लहान, लोणी, कोंढा इत्यादी गावांची भेट दुपारपर्यंत पूर्ण केली होती. ठिकठिकाणी बाधित शेतकरी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. दुसरीकडे आ. श्रीजया चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील मुगट, आमदुरा आणि अन्य काही बाधित गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
९-१० जूनदरम्यान वादळीवाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे अर्धापूर-मुदखेड तालुक्यातील अनेक गावे आणि भोकरच्या काही भागांत पिकांचे विशेषतः केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे बधायला मिळाले. हाताशी आलेले केळीसारखे नगदी पीक जमीनदोस्त झाल्याचे दृश्य विषण्ण करणारे आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता, त्यांना विमा कंपनीकडून भरपाई मिळेल; पण ज्यांनी पीकविमा काढला नव्हता त्यांना मदत देण्यासंबंधी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार असून याविषयी महसूलमंत्र्यांशी आपले बोलणे झाले आहे.
- खा. अशोक चव्हाण