Ayurvedic college promotion dispute : आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदोन्नतीचा वाद चव्हाट्यावर !

आ. बोंढारकरांच्या तक्रारीमुळे खळबळ; प्रभारी अधिष्ठाता डॉ. पाटील यांनी फेटाळले आरोप !
Ayurvedic college promotion dispute
आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदोन्नतीचा वाद चव्हाट्यावर !pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात कर्मचायांच्या पदोत्रतीवरून मागील काही दिवसांपासून सुरू झालेला अंतर्गत वाद अखेर चव्हाट्यावर आला आहे. महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. यशवंत सक्पाल पाटील यांनी पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवून अपात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याचा गंभीर आरोप नदिंड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर यांनी केला आहे. बोंढारकर यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात पाटील यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आ. बोंढारकर यांनी आपल्या स्वेिदनात या महाविद्यालयातील कक्षसेविका ज्योती मारोती पांचाळ यांच्या पदोन्नतीबाबतचा विशेष उल्लेख केलेला आहे. त्यांना प्रयोगशाळा सहायकपदी पदोनती देताना प्रभारी अधिाग्रता डॉ. यशवंत पाटीलपांनी त्यांची सेवा ज्येष्ठता डावलून त्यांच्यापेक्षा दहा वर्षे कनिष्ठ असलेल्या व अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यास नियमबाह्य पात्र ठरवून पदोन्नती दिल्याचा आरोप केला आहे. पाटील यांच्या या निर्णयामुळे सौ. पांचाळ यांच्यावर अन्याय झाल्यानेही त्यांनी नमूद केले आहे.

Ayurvedic college promotion dispute
Bus stand women safety : बसस्थानकांमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर

ज्योती मारोती पांचाळ या महाविद्यालयात ८ जुलै २००९ पासून कक्षसेविका पदावर कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त त्या महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर म्हणूनही काम पाहतात. पदोनतीसाठी त्या पात्र असतानाही त्यांना डावलण्यात आल्याचा उल्लेख या निवेदनात आहे. याच महाविद्यालयातील आणखी एक कर्मचारी राजरतन कांबळे यांनाही पदोनतीपासून वंचित ठेवल्याचा प्रकार पडल्याचे आ. बोंडारकर यांनी निदर्शनास आणून दिले.

प्रभारी अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांनी मागील सात वर्षांत पदाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप आ. बोंडारकर यांनी केला आहे. मागील तीन वर्षापूर्वी रसशाळा विभागासाठो सुमारे दोन कोटी रुपये मंजूर झालेले असताना पाटील यांनी मर्जीच्या गुत्तेदारामार्फत थातूरमातूर कामे करून आर्थिक गैरव्यवहार केला आहे.

Ayurvedic college promotion dispute
Illegal sand mining : वाळूघाटातून मशिनव्दारे वाळू उपसा

शिवाय चालू परिस्थितीतील रसशाळा बंद करून नवीन रसशाळेसाठी ६०० ते ८०० कोटीचा प्रस्ताव परस्पर सादर केला आहे. विशेष म्हणजे ही रसशाळा स्वतः च्या फायद्यासाठी इतरत्र स्थलांतरित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचेही आ. बोंढारकर यांनी माटले आहे. या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.

ती महिला पदोन्नतीसाठी पात्र नाही : डॉ. पाटील

पदोत्रतीबाबत ज्या कर्मचारी महिलेचा संदर्भ घेऊन आ. बोंढारकर यांनी मंत्र्यांकडे तक्रार दिली, ती महिला पदोन्नतीसाठी पात्र नव्हती, याबाबत लोकप्रतिनिधींची दिशाभूल करून माझ्याविरुद्ध गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्याविरुद्धचे सर्व आरोप निराधार आहेत. याप्रकरणी मंत्र्यांनी माझ्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मला मिळाली नाही, असे प्रभारी अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news