Nanded Crime : नांदेडमध्ये अवैध शस्त्र, जिवंत काडतुसांच्या विक्रीचा डाव उधळला

३६ जिवंत काडतुसांसह दोघांना अटक; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता
nanded crime
Nanded Crime : नांदेडमध्ये अवैध शस्त्र, जिवंत काडतुसांच्या विक्रीचा डाव उधळलाfile photo
Published on
Updated on

Attempt to Sell Illegal Weapons and Live Cartridges Foiled in Nanded

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यात गावठी पिस्तूल आणि अवैध शखांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असतानाच नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल ३६ जिवंत काडतुसांची अवैध विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

nanded crime
‌Nanded News : ‘पीपल्स‌’च्या प्राचार्यपदासाठी सारी यंत्रणा ‌‘अशोक वना‌’त उभी!

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना विद्यापीठ परिसरातील झरी येथील खदान भागात काही तरुण शस्त्रांची आणि काडतुसांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची पक्की गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ११ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात शौनक गुलाव शिंदे (१९, रा. विष्णुप री) व जावेद रहेमत शेख (२०, रा. विष्णुपुरी) जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या दोघांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडले.

या दोघांकडून १ लाख ८ हजार रुपये किमतीची एकूण ३६ जिवंत काडतुसे (पितळ आणि तांब्याचे धातू असलेलली) जप्त केली. तसेच यातील आनंद ऊर्फ चिन्नू सरदार यादव (रा. वजिराबाद) हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

nanded crime
Ban on illegal sex determination : गर्भलिंग निदान करणाऱ्याची माहिती द्या अन्‌‍ मिळवा 1 लाखाचे बक्षीस

नांदेड जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामागे केवळ हे तरुण नसून, एखादी मोठी आंतरराज्यीय टोळी किंवा अवैध शस्त्र रॅकेट असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

तपास आणि पोलिस पथक

आरोपींनी ही काडतुसे नेमकी कोठून आणली? ती कोणाला विकली जाणार होती? आणि याआधी त्यांनी अशा प्रकारची शस्त्रे कोणाकोणाला पुरवली आहेत? याचा सखोल तपास पोलिस करत आहेत. ही धाडसी कारवाई पोलिस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, स्वनील साळुंके आणि त्यांच्या पथकाने केली आहे. सायबर विभागाचीही या तपासात मदत घेतली जात आहे. नांदेडमध्ये गेल्या काही महिन्यांत गावठी कट्टे आणि शस्त्रास्त्रांचा वापर वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. ग्रामीण पोलिसांनी केलेली ही कारवाई गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news