Nanded Crime News : मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस नांदेडात ठोकल्या बेड्या

नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी ‌‘ऑपरेशन फ्लश आऊट‌’ मोहीम हाती घेतली
Nanded Crime News
बलात्कारी नराधम आरोपीसह (खाली बसलेला) पोलीस पथक.pudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः मुंबईच्या निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गेली दीड महिना फरार असलेल्या नराधम आरोपीला नांदेड ग्रामीण पोलीसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. मोहम्मद आवेश मोहम्मद गौस मनियार (वय 26, रा. खुदबेनगर, नांदेड) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मुंबईतील खार पूर्व भागात 17 एप्रिल 2026 रोजी हा संतापजनक गुन्हा घडला होता. याप्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात ‌‘पोक्सो‌’ आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल होताच आरोपी अटक टाळण्यासाठी पसार झाला होता. दरम्यान, नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी ‌‘ऑपरेशन फ्लश आऊट‌’ मोहीम हाती घेतली आहे.

Nanded Crime News
Nanded News : फरारी आरोपीला हैदराबादमधून अटक

याच मोहिमेदरम्यान, आरोपी आवेश हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपल्याची गोपनीय माहिती मिळाली. मुंबई पोलीस देखील त्याच्या मागावर नांदेडात दाखल झाले होते. त्यानुसार नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर, उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, समीर अहेमद व मुंबई पोलीसांच्या संयुक्त पथकाने इदगा परिसरातील मलंगबाबा बिल्डिंगजवळ सापळा रचला.

पोलीसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधमाला पोलीसांनी शिताफीने घेरून ताब्यात घेतले. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Nanded Crime News
Digital Arrest : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मुंबईतील तरुणीला ३२ लाखांचा गंडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news