Digital Arrest : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मुंबईतील तरुणीला ३२ लाखांचा गंडा

गंडवणाऱ्या नांदेडच्या चार तरुणांना मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
Digital Arrest
Digital ArrestPudhari
Published on
Updated on

Mumbai girl duped of Rs 32 lakhs under the guise of digital arrest

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मुंबईतील एका २१ वर्षीय तरुणीला दहशतवादाशी संबंध असल्याचे सांगून ३२ लाख ६९ हजार रुपयांना गंडवणाऱ्या नांदेडच्या चार तरुणांना मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा बनाव रचून या तरुणांनी पीडित तरुणीला चार दिवस घरातच डिजिटल अरेस्टमध्ये ठेवल्याचे धक्कादायक घटना घडली आहे.

Digital Arrest
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरात राहणाऱ्या या तरुणीला आरोपींनी फेब्रुवारी २०२६ मध्ये व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल केला आणि आपण चेन्नई पोलिसातून बोलत असल्याचे सांगून, "पहेलगाम हल्ल्यातील दहशतवादी अफजल खान याच्याकडे तुमच्या आजीच्या नावाचे सिमकार्ड सापडले असून त्याद्वारे देशाची गोपनीय माहिती शत्रू राष्ट्राला पुरवली जात आहे," अशी भीती आरोपींनी घातली. तरुणीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी पोलीस गणवेश परिधान केला होता आणि त्यांच्या मागे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), मुंबई असा फलकही लावला होता.

आरोपींनी तरुणीला आणि तिच्या कुटुंबाला आरटीई नावाचे अॅप डाऊनलोड करायला लावून चार दिवस तपासण्यासाठी पैसे आरबीआय प्रतिनिधीच्या खात्यावर पाठवावे लागतील, जे तपासणीनंतर तुम्हाला परत केले जातील," असे खोटे आश्वासन देऊन आरोपींनी ३२ लाख ६९ हजार ९९७ रुपये उकळले. यासाठी आरोपींनी बनावट एफआयआर, अटक वॉरंट आणि इम्युनिटी सर्टिफिकेट सुद्धा पाठवले होते.

Digital Arrest
Parbhani News | मृताच्या नावे गुन्हा अन् नवरदेवाच्या हाती बेड्या; बोरी दंगल प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर!

तरुणीचे वडील जर्मनीतून मुंबईत परतल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तरुणीच्या वडीलांनी. मुंबई पोलिसांना या बाबत माहिती दिली. मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आर ोपींचे धागेदोरे शोधले असता ते आरोपी हे नांदेडचे असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने शनिवारी निलेश प्रभाकर वासमवार (वय २५, रा. साईनगर, सिडको) शुभम संजय जोगदंड (वय २५, रा. शक्तीनगर, इतवारा), अजय देविदास भोसले (वय २५, रा. लोहार गल्ली, इतवारा) सिद्धांत दिलीप जोंधळे (वय १९, रा. शक्तीनगर, इतवारा) या चारही आरोपींना अटक केली. तसेच या आरोपींचा इतरही अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याची बाब पुढे आली आहे. इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी ही अटके बाबत दुजोरा दिला असून, या प्रकरणाची इतवारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नांदेड येथून चारही आरोपींना घेऊन मुंबई पोलीस रवाना झाली आहे.

मोठं रॅकेट असण्याची शक्यता...

डिजिटल अॅरेस्ट प्रकरण साधं नसून, नांदेडचे १९ ते२५ वर्ष वयाचे महाविद्यालयीन तरुण आहेत. पहेलगाम हल्याचा हवाला देऊन मुंबई च्या तरुणीला ३२ लाखांला गंडविणे, बनावट एटीएस अधिकारी असल्याचे भासवूने हे चार तरुणांचं काम नाही तर या मागे कुठले मोठं रॅकेट आहे. नांदेडच्या तरुणांनी एवढा मोठा गेम का खेळला. पडद्यामागे कोण-कोण आहे याचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news