Nanded News : घरफोडीच्या गुन्ह्यांतील फरार आरोपी गजाआड; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Absconding accused in housebreaking cases put behind bars; stolen property worth ₹1.25 lakh seized.

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या घटनांनी धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या धडक कारवाईत आरोपीकडून रोख रकमेसह एकूण १ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Crime News
Maratha Reservation : जरांगे-सरकारमध्ये सकारात्मक चर्चा

जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिले होते. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, हदगाव पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी शाहरुख उर्फ रहिम शेख अबुबकर सिद्दीकी (वय २९, रा. आझाद चौक, हदगाव) हा नांदेड येथील हिंगोली गेट पुलाखाली येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.माहिती मिळताच पथकाने हिंगोली गेट परिसरात सापळा रचून संशयित शाहरुख याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार आर्यन अरुण कोरी (रा. मध्य प्रदेश, ह.मु. नागपूर पूर्व अटक) याच्या मदतीने हदगाव हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली.

ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि गोविंद खैरे, अंमलदार विक्की कालरा, राजकुमार डोंगरे आणि लामतुरे यांच्या पथकाने केली. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी हदगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Crime News
Maratha Reservation : जरांगेंच्या मागण्यांवर सरकारने दर्शविली सहमती

५ गुन्ह्यांचा उलगडा

आरोपीची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ९८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम आणि १५ हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल टॅब असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे हदगाव पोलीस ठाण्यातील घरफोडीचे तब्बल ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news