

45 tolas of gold, which had been stolen from the train, have been recovered.
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : दोन महिन्यांत रेल्वेतून विविध १५ गुन्ह्यांत चोरीस गेलेला ४५ तोळे सोन्याचा मुद्देमाल रेल्वे पोलिसांनी जप्त केला असून, रेकॉर्डवरील ८ आरोपींना अटकही केली.
(छत्रपती लोहमार्गच्या संभाजीनगर) पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड रेल्वे पोलिस निरिक्षक प्रकाश वाघमारे व लोहमार्ग छ. संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक व नांदेडचे तपास पथकात काम करणारे सपोनि शैलेश जोगदंड, पोउपनि स्वाती ठाकूर
योगेश गिरी, पंकज पुरी, राहुल दाभाडे, राजु राठोड, कांचनकुमार राठोड, वसीम शेख, सचिन निकाळजे, छापेवार, श्री. गुप्ता, नितीन हाके, इस्माइल शेख, श्री. लिंगायत, राम चंदेल, प्रकाश मुंडे, तुकाराम गवळी, नीलेश सोनवणे, श्री. कांबळे, अक्षय यादव, इम्राण शेख, राधा केंद्रे, सुवर्णा नागरगोजे, राजनंदीनी राजपुत, आशा धुळे, सना नवाडे यांनी कामगिरी केली आहे.