

Local leader's appeal to disgruntled BJP rebels
नांदेड : नांदेड वाघाळा शहर मनपाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार मंगळवारी निश्चित झाल्यानंतर तिकिटाची आशा बाळगून असलेल्या अनेकांची निराशा झाली, काहींच्या बाबतीत अगदी शेवटच्या क्षणी पात झाला अशा नाराजांना आता पक्षाच्या स्थानिक नेत्याकडून संपर्क साधला जात आहे. 'मी प्रयत्न केला; पण जमलं नाही... आता कामाला लागा' असे स्पष्टीकरण व सूचना त्यांना दिली जात आहे!
मनपाच्या इतिहासात आजवर दोन आकडी संख्येत नगरसेवक निवडून आणू न शकणाऱ्या भाजपाने यावेळी २० प्रभागांपैकी १७ प्रभागांत मिळून ६७ उमेदवार उभे केले असून इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे, भाजपाकडे पाचशे-हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली भाजपातील नाराज-बंडखोरांना स्थानिक नेत्याची साद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होती, त्यांतील ५० टक्के इच्छुक वर दावेदार झाले होते. त्यांतून ६७ जणांची निवड करताना स्थानिक निवडकर्त्यांना बरीच कसरत करावी लागली. दोन-तीन जणांच्या उमेदवारीचा विषय तर थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर भाजपा नेत्यांचे पुढील नियोजन सुरू झाले. पक्षाचे निवडणूकप्रमुख अशोक चव्हाण यांनी नार-जिवीरांशी संवाद व संपर्क चालवला असून त्यांची समजूत काढण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.
भारपाने प्रभाग क्र.९ मध्ये शेवटच्या क्षणी कोण्या सदिच्छा सोनी पाटील नामक महिलेची निवड करून पक्षाच्या एका विद्यामान पदाधिकाऱ्याची इच्छा पूर्ण केली: पण या प्रयोगात एका ज्येष्ठ नेत्याचा मानभंग झाल्याचे समोर आले आहे. पक्षात नाव नाव नसलेल्या महिलेला उमेदवारी दिल्याने पक्षाचे माजी आमदार राम पाटील रातोलीकर यांच्या सूनबाईची संधी हुकली. आता या प्रभागात भाजपाच्या किशोर स्वामी यांचा पाय खोलात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण रातोळीकर यांचे पुत्र संजय पाटील यांनी वरील प्रभागात ओबीसी प्रवर्गातून अर्ज भरला असून ते अपक्ष उभे राहण्याच्या तयारीत आहेत. त्यांना 'राष्ट्रवादी च्या दोन पदाधिकाऱ्यांसह स्वामी यांच्या अनेक विरोधकांनी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.
नांदेडच्या समाजकारणात अनेक सामाजिक उपक्रमांची गुढी उभारणाऱ्या दिलीप ठाकूर यांच्यावरही अन्याय झाला. त्यांनीही अपक्ष अर्ज भरला आहे. भाजपाकडून घात झाल्यामुळे काहींनी शिव सेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत, त्या पश्चांची उमेदवारी मिळविली. तरोडा भागात 'पाणीवाला छोकरा' ही ओळख निर्माण करणाऱ्या विनायक सगर यांनी भाजपाकडून अन्याय झाल्यामुळे बंडखोरीचा झेंडा फडकविला आहे. अशा नाराज असलेल्या उमेदवारांशी बुधवारपासून संपर्क सुरू झाला आहे.
वजिराबाद-गाडीपुरा या बहुचर्चित प्रभागांमध्ये अनेक इच्छुकांतून चार जणांची निवड झाली. या प्रभागात माजी नगरसेवक अमित तेहरा यांचा पत्ता अन्य तीन उमेदवारांनी मोठ्या हिंमतीने कट केला. त्यानंतर तेहरा यांनी स्वतःहून माघार घेतल्याचे चित्र भाजपाच्या स्थानिक मुख-पत्रातून उभे करण्यात आले. भाजपाने तेहरांना विश्रांती दिल्याबद्दल बोरवन परिसरातील अनेक डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले आहे.