

लोहा: लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरील राधाई हार्डवेअर अँड पेंट हाऊस या दुकानाला शॉटसर्कीट मुळे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यात जवळपास ४० लाख रुपयाचे नूकसान झाले. असून तिन्ही दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले’, ‘वैष्णवी बॉडी बिल्डर्स’ आणि ‘शिवकाशी वेल्डिंग वर्कशॉप’ ही दुकाने जळून खाक झाली
मंगळवारी सायंकाळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी घटनास्थळी भेट दिली. व संबंधितांना सूचना दिल्या. लोहा शहरातील मुक्ताईनगर समोर मुख्य रोडवर सतीश अशोकराव शेटे यांचे इंदिराई हार्डवेअर व पेंट हाऊस हे दुकान आहे. मुख्य रस्त्यावर विद्युत खांब आहेत. या पोलला एका वाहनाची जोरदार धडक बसली स्पार्कीग मुळे हार्डवेअर व पेंट हाऊसमध्ये शॉट सर्किट झाले आणि दुकानाला भीषण आग लागली, पहाता पहाता आगिने रौद्ररुप धारण केले. आग लागल्याची घटना कळताच नगराध्यक्ष शरद पवार व सहकारी घटनास्थळी तात्काळ पोहचले आ. प्रतापराव पाटील यांना घटनेची महिती दिली.
भीषण आगीच्या घटनास्थळी आमदार चिखलीकर यांची पाहणी
लोहा शहरात सोमवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेषतः इंदिराई ट्रेडर्स या दुकानाचे सुमारे ४० लाख रुपयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घटनास्थळी भेट दिली पाहणी केली. व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून बाधितांना आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या, नगराध्यक्ष शरद पवार, तहसीलदार विठ्ठल परळीकर, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, नगरसेवक केशवराव मुकदम, मारोती जंगले, सदानंद तेलंग, माजी संचालक अंकुश कदम, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.