Nanded Boy Drowns : अनधिकृत स्विमिंग पूलमध्ये बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलाच्या मृत्यूनंतर किनवटमध्ये संताप
Nanded Boy Drowns
Nanded Boy Drowns : अनधिकृत स्विमिंग पूलमध्ये बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल file photo
Published on
Updated on

13-Year-Old Boy Drowns in Unauthorized Swimming Pool; Case Registered Against Operator

किनवट, पुढारी वृत्तसेवा

शहरातील इस्लामपूरा परिसरातील अनधिकृत स्विमिंगपूलमध्ये बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित स्विमिंगपूल चालकाविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांना कोणतीही सुरक्षा व्यवस्था, प्रशिक्षित ट्रेनर किंवा जीवरक्षक साहित्य उपलब्ध करून न देता निष्काळजीपणा केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला असून, या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.

Nanded Boy Drowns
Ambajogai News : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलतज्ज्ञ डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून मृत्यू

ज्ञानेश्वर गजानन चंद्रे (वय १३, रा. एस.टी. महामंडळ वसाहत, किनवट) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे काका नागनाथ शेषराव चंद्रे (रा. सावरी, ता. किनवट) यांनी किनवट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. २८) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास इस्लामपूरा परिसरातील चौकोणी पत्र्यांनी वेढलेल्या खासगी स्विमिंगपूलमध्ये ही घटना घडली.

फिर्यादीनुसार, ज्ञानेश्वर हा त्याचा मामेभाऊ गिरिधर माधव पंडागळे (वय १४, रा. कोल्हारी) याच्यासोबत पोहण्यासाठी स्विमिंगपूलवर गेला होता. काही वेळानंतर गिरिधर हा एकटाच घरी परत येऊन ज्ञानेश्वर पाण्यात बुडाल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता ज्ञानेश्वरला उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयात व नंतर गोकुंदा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

Nanded Boy Drowns
झाडाला लटकलेल्या अवस्थेत अनोळखी महिला-पुरुषाचे कुजलेले मृतदेह सापडले

त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी पाहणी केली असता संबंधित स्विमिंगपूलमध्ये गढूळ पाणी असल्याचे तसेच अल्पवयीन मुलांसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित ट्रेनर, लाईफ जॅकेट, जीवरक्षक अथवा अन्य सुरक्षासुविधा नसल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित चालकाने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता स्विमिंगपूल सुरू केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वरचे वडील गजानन चंद्रे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या किनवट आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेनंतर चंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, किनवट शहर व परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत स्विमिंगपूलची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news