Ambajogai News : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलतज्ज्ञ डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून मृत्यू

सहा महिन्यांपूर्वीच निष्णात जलतरणपटू विश्वनाथ बुरांडे यांचा काळवटी तलावाने घेतला होता बळी
Ambajogai News : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलतज्ज्ञ डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून मृत्यू
Published on
Updated on

Dr. Abhimanyu Tarkase, an anesthesiologist at Swarati Medical College, drowns in a lake

अंबाजोगाई : गोविंद खरटमोल येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र (एनॅस्थेशिया) विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा आज सकाळी काळवटी साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. डॉ तरकसे हे नियमितपणे पोहणाऱ्या पैकीच एक होते मात्र तरीही त्यांचा पोहतांना बुडून मृत्यू झाल्याने हळहळ होत आहे.

Ambajogai News : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलतज्ज्ञ डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून मृत्यू
Beed Crime | डॉक्टर विद्यार्थ्याने गळफास घेतल्याने अंबाजोगाईत खळबळ

सदरील घटना ही आज सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या वृत्तामुळे संपूर्ण अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून, डॉ. तरकसे यांच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी काळवटी तलावाकडे धाव घेतली.

डॉ. अभिमन्यू तरकसे हे प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनियमाणे अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काळवीट साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे एकटेच पोहण्यासाठी तलावात उतरले. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या कमरेला बिसलरीची रिकामी बाटलीही बांधली होती. मात्र, काही वेळानंतर तलावातील सांडव्याच्या बाजूला एक मृतदेह तरंगताना पोहणाऱ्या काही लोकांच्या निदर्शनास आले असतांना त्यांनी जवळ जाऊन खात्री केल्यानंतर हा मृतदेह डॉ. अभिमन्यू तरकसे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.

Ambajogai News : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलतज्ज्ञ डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून मृत्यू
Beed drowning death | सरस्वती तलावात बुडून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले होते शिखर

मूळचे अंबाजोगाई जवळील धावडी गावचे रहिवासी असलेल्या डॉ. अभिमन्यू तरकसे यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले होते. या बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले. त्यानंतर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातूनच त्यांनी वैद्यकीय पदवी (MBBS) घेतली. पुढे याच महाविद्यालयातून त्यांनी भूलशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच संस्थेत ज्युनिअर रेसिडेंट म्हणून रुजू झालेले डॉ. तरकसे आपल्या कौशल्याच्या जोरावर पुढे याच विभागाचे प्रमुख म्हणून देखील कार्यरत झाले होते.

दरम्यान डॉ. तरकसे यांच्या या दुर्दैवी निधनाने वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मित्रांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि डॉ तरकसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आणला. डॉ. तरकसे यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? त्यांना पोहताना हृदयविकाराचा झटका आला की अन्य काही घडले, याचा खुलासा शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

एका अत्यंत मनमिळाऊ आणि हुशार तज्ज्ञ डॉक्टरांच्या अकाली जाण्याने अंबाजोगाई शहरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या काळवटी साठवण तलावात दिवसेंदिवस पोहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठया प्रमाणावर वाढतांना आढळून येत आहे. वर्षातून दोन ते तीन पोहणाऱ्यांचा बळी याच तलावात पोहतांना जात आहे. यामुळे त्यांची कुटुंब उघड्यावर पडत आहेत. त्यामुळे या तलावावर पोहण्यासाठी निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने प्रशासनाकडे केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news