नांदेड: हदगावात बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड: हदगावात बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on
Updated on

हदगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्के आतील घटनात्मक आरक्षण देण्यात यावे. यासह अन्य काही मागण्यांच्या पुर्ततेसाठी मागील १४ दिवसांपासून दत्ता पाटील हडसानीकर हा आमरण उपोषण करत आहे. त्याला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने आज (दि.१७) हदगाव बंदची हाक देण्यात आली होती. याला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रतिष्ठाने बंद ठेवली.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्के आतील घटनात्मक आरक्षण देण्यात यावे, ओबीसीचे अतिरिक्त बोगस आरक्षण तात्काळ रद्द करावे, शासकीय मेगा भरतीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यानंतर शासकीय मेगा नोकर भरती सुरू करण्यात यावी, तसेच यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालय येथे देण्यात आलेल्या सर्व निवेदनातील प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्या, या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील मौजे हडसणी येथील दत्ता पाटील हडसणीकर हे गावातील हनुमान मंदिर येथे ३ जुलैपासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा १४ दिवस असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांना नांदेड येथील शासकीय जिल्हा रुग्णालय विष्णूपूरी येथे दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्या उपोषणाला तालुक्यातील बऱ्याच ग्राम पंचायतींनी व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने हदगाव बंदची हाक देण्यात आली होती. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच आप-आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली.

मराठा समाजाच्या वतीने बंदची हाक्क देऊन पण प्रशासन स्तरावर दत्ता पाटील यांच्या आमरण उपोषणाची कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली असल्याने शासनाने तात्काळ त्यांच्या आमरण उपोषणाची दखल घ्यावी यासाठी मराठा समाजाच्या वतीने घोषणाबाजी करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पंजाबराव देशमुख, राजकुमार भुसारे, पप्पू कदम, शिवाजी जाधव, पिंटू देशमुख, दीपक मुधोळकर, राजू पाटील हडसणीकर, राजू कदम, प्रल्हाद पाटील, शिवशंकर शिंदे, दशरथ सूर्यवंशी तुकाराम पवार भागवत पवार, अतुल कदम ज्ञानेश्वर डोळस, अजय भालेराव, दिगंबर हुंडेकर, गंगाधर कदम, सचिन पाटील, अविनाश पाटील, विनोद कदम, शिवम पाटील, तुकाराम सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी, यांच्यासह अनेक मराठा समाज बांधव उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news