नांदेड : जिल्ह्यात ७ ते ११ नोव्हेंबरपर्यंत वाहतूक मार्गात बदल

वाहतूक मार्गात बदल,
वाहतूक मार्गात बदल,
Published on
Updated on

नांदेड : पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. दि. ७ ते ११ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी वाहतुकीच्या नियामात हा बदल केला आहे. त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाने परवानगी दिलेल्या वाहनांना या अधिसुचनेतून मुभा देण्यात आली आहे.

सोमवार ७ नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत नर्सी चौक ते देगलुर राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 सर्व प्रकारचे वाहतुकीसाठी जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. त्याऐवजी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून नरसी- गडगा- खरब खंडगांव- भायेगाव मार्ग देगलूर येण्या-जाण्यासाठी वाहतूक सुरू राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी- गडगा- मुखेड- बाऱ्हाळी- मुक्रमाबाद- करडखेड- देगलुर येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील. नर्सी- कासराळी- रुद्रापुर- मुतन्याळ- थडीसावळी- खतगाव- कोटेकल्लुर- शहापूर- सुंडगी- हनुमान हिप्परगा- देगलुर. तसेच देगलुरकडून याच मार्गाने येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील.

मंगळवार 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत नर्सी चौक ते देगलुर राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 सर्व प्रकारचे वाहतुकीसाठी जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग नर्सी- गडगा- खरब खंडगाव- भायेगाव मार्ग देगलुर येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी- गडगा-मुखेड- बाऱ्हाळी- मुक्रमाबाद- करडखेड- देगलुर येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील. नर्सी- कासराळी- रुद्रापूर- मुतन्याळ- थडीसावळी- खतगांव- कोटेकल्लुर- शहापूर- सुंडगी- हनुमान हिप्परगा- देगलुर येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील.

बुधवार 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत धनेगाव फाटा पासून ते नर्सी -देगलुर राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 सर्व प्रकारचे वाहतुकीसाठी जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग जड वाहनासह इतर वाहनांकरीता नांदेड- मुदखेड- उमरी- धर्माबाद- कुंडलवाडी- बिलोली- तेलंगाना येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील. नांदेड- मुदखेड- उमरी- कारेगांव फाटा – कासराळी- रुद्रापूर- मुतन्याळ- थडीसावळी- खतगाव- कोटेकल्लुर- शहापूर- सुंडगी- हनुमान हिप्परगा- देगलुर  वाहतूक चालू राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नांदेड- कंधार- जांब- जळकोट- उदगीर मार्गे लातूर / कर्नाटक वाहतूक चालू राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नांदेड- कंधार- मुखेड- हिब्बट मार्ग -खानापूर- देगलुर वाहतूक चालू राहील.

गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत नागपूर-हिंगोलीकडून येणारी वाहतूक सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. नर्सीकडून नांदेडकडे जाणे-येण्यासाठी सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. चंदासिंग कार्नर ते ढवळे कार्नर जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. चंदासिंग कार्नर – वाजेगाव-देगलुर नाका- बाफना- रेल्वे स्टेशन जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. महाराणा प्रताप चौकाकडून बाफना टि पॉईन्टकडे येणारी व जाणारी तसेच महाराणा प्रताप चौकाकडून हिंगोली गेट व चिखलवाडीकडे जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. रेल्वे स्टेशन- शिवाजी महाराज पुतळाकडून गांधी पुतळयाकडे जाणारी व वजीराबाद चौकाकडे येणारी वाहतुकीसाठी बंद राहील.

महावीर चौक ते शिवाजी महाराज पुतळयाकडे जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. महावीर चौक ते वजीराबादकडे जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. जुना कौठा- रामसेतु पुल -तिरंगा चौक -वजीराबाद चौक कडे येणारी वाहतूक वजीराबाद चौक ते आायटीआय चौक जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. आायटीआय चौक ते अण्णा भाऊ साठे पुतळयाकडे जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. परत आायटीआय चौक ते राज कार्नर-आसना ब्रिजकडे जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. आसना ब्रिज ते शंकरराव चव्हाण चौकाकडे जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. भोकर फाटा ते नांदेड कडे येणारी वाहतूक आसना ब्रिज पर्यंत बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग नागपूर- हिंगोलीकडून येणारी -जाणारी वाहतूक औंढा मार्गे -परभणी-पालम-लोहा -लातूर येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील.

नागपूर- हिंगोली कडून येणारी -जाणारी वाहतूक – भोकर फाटा- भोकर- उमरी- धर्माबाद- कुंडलवाडी- बिलोली- देगलुर, नागपूर- हिंगोलीकडून येणारी -जाणारी वाहतूक – भोकर फाटा- मुदखेड- उमरी- कारेगांव फाटा- बिलोली -तेलंगाना येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी -गडगा- कौठा- कलंबर- उस्मानगर- नांदेड येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील. जड वाहनासह इतर वाहनांकरिता नर्सी -कासराळी- कारेगांव फाटा- उमरी- मुदखेड- नांदेड येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील. तुप्पा पाटी ते गोपाळचावडी-ढवळे कार्नर-दूध डेअरी-साई कमान/ नावघाट पुल ते जुना मोंढा येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील. तुप्पा पाटी ते गोपाळचावडी-ढवळे कार्नर- संभाजी चौक- लातुर फाटा – लातुर-लोहा येणारे-जाणारे वाहन तसेच जुना मोंढा कडे येणारे वाहतूक चालू राहील. वजीराबाद चौक ते राज कॉर्नर कडे जाण्या-येण्यासाठी तिरंगा चौक- लालवाडी अंडर ब्रिज- महावीर सोसायटी- गणेश नगर वाय पॉईन्ट- पावडेवाडी नाका मोर चौक- छत्रपती चौक ते राज कार्नर येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील.

शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यत नागपूर-हिंगोलीकडून येणारी वाहतूक सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. आसना ब्रिज पासुन ते भोकर फाटा-वसमत फाटा- ते अर्धापुर व जिल्हा बार्डर पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक जाणे-येण्यासाठी पुर्णपणे बंद राहील. येळेगांव फाटा ते भोकर फाटाकडे येणारी सर्व प्रकारची जाणे-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील. याऐवजी पर्यायी मार्ग नागपूर- हिंगोलीकडून येणारी -जाणारी वाहतूक औंढा मार्गे – परभणी-पालम-लोहा -लातूर येण्या-जाण्यासाठी वाहतूक चालू राहील. नागपूर कडून येणारी -जाणारी वाहतूक हदगाव- भोकर- बारड- मुदखेड-मार्गे सुरू राहील.

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news