नांदेड : अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्‍यू

file photo
file photo

धर्माबाद; (नांदेड); पुढारी वृत्‍तसेवा अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत बेलूर बुद्रुक रोडवर महिलेचा जागीच मृत्यू झाला. धर्माबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्माबाद कंदाकुर्ती या राष्ट्रीय महामार्गावरुन आज पहाटे सुमारे पाच वाजता भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बेलूर बुद्रुक येथील अश्विनी नागनाथ भूमकर (वय 28) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील महामार्गावरुन रेती व मुरुमाची ओव्हरलोड भरधाव वाहने रोज धावत आहेत. यावर महसूल विभागाने कोणताही आवर घालण्यासाठी प्रयत्न केला नाही. या मार्गावर वाहनांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे.

आज 19 जून रोजी पहाटे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बेलूर बुद्रुक येथील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन व वाहन चालक विरुद्ध कलम 279, 304 अ भा द वी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काँन्स्‍टेबल मुनलोड हे करीत आहेत.

धडक देऊन पळून गेलेले वाहन कोणते होते? त्याचा चालक कोण ? व त्या वाहनातून नेमकी काय वाहतूक सुरू होती. याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक माहिती मिळताच धर्माबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन व वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news