बीड : माजलगाव बाजार समितीत महाविकास आघाडीची बाजी

बीड : माजलगाव बाजार समितीत महाविकास आघाडीची बाजी
Published on
Updated on

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : येथील माजलगाव बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १८ पैकी १२ जागा जिंकून गड राखला. भाजपचे नितीन नाईकनवरे, मनोज जगताप, भगवान आगे, डॉ. श्रीराम खळगे विजयी झाले. तर माजी आमदार राधाकृष्ण होके गटाचे व्यापारी मतदारसंघात प्रभाकर होके व जुगलकिशोर नावंदर विजयी झाले. या निवडणुकीसाठी आज (दि.३०) मतदान झाले. दुपारी चार वाजेपर्यंत ९६.९३ टक्के मतदान शांततेत झाले.

माजलगाव बाजार समिती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपकडून प्रतिष्ठेची केली होती. आज सकाळी ७ वाजल्यापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रावर आमदार प्रकाश सोळंके, भाजप- शिवसेना ठाकरे गट असे सर्वपक्षीय नेते तळ ठोकून होते. सोसायटी मतदारसंघात ११ जागांसाठी ६०९ पैकी ६०१ मतदारांनी हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदारसंघात ४ जागांसाठी ५५३ पैकी ५४९ मतदारांनी हक्क बजावला.

व्यापारी मतदार संघात २ जागांसाठी ७८५ पैकी ७३३ मतदारांनी हक्क बजावला. तर हमाल मापाडी मतदार संघात १ जागांसाठी २३३ पैकी २३० मतदारांनी हक्क बजावत एकूण २१८० मतदारांपैकी २११३ मतदारांनी मतदान केले.

पंचायत समिती सभागृहात सहाय्यक निबंधक विकास जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होऊन त्यात हमाल-मापाडी मधून कदिर शेरखान पठाण हे अपक्ष म्हणून ३० मतांनी विजयी झाले. व्यापारी मतदारसंघात माजी आ. राधाकृष्ण होके गटाचे प्रभाकर होके व जुगलकिशोर नावंदर हे विजयी झाले. सोसायटी मतदारसंघात आमदार प्रकाश सोळंके गटाचे अशोक डक, जयदत्त नरवडे, डॉ. उद्धव नाईकनवरे, वीरेंद्र सोळंके, भागवत शेजुळ, दत्तात्रय डाके, संजय कचरे, महिलामधून अंजली भोसले, भाजपचे डॉ. श्रीराम खळगे विजयी झाले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news