परळीवैजनाथ, पुढारी वृत्तसेवा: माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने परळी बाजार समितीवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. सर्वच्या सर्व 18 जागा जिंकून भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवला. या निकालामुळे भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला. भाजपा पॅनलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. 28 एप्रिलरोजी बाजार समितीच्या संचालक पदाच्या 18 जागेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज येथील तहसिल कार्यालयात झाली. मतमोजणी प्रक्रिया संथ गतीने सुरू होत असल्याने अंतिम निकालाला काही तास विलंब झाला.
परळी बाजार समिती गेल्या बारा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी बाजार समितीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनलला सर्वच जागेवर पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
अशोक भानुदास डिघोळे, प्रभाकर आबाजी दहिफळे, दत्तात्रय त्रिंबकराव देशमुख, भाऊसाहेब वामनराव नायबळ, राजाभाऊ पौळ, लक्ष्मण पौळ, रणजित विष्णुपंत सोळंके, भाग्यश्री संजय जाधव, कमलाबाई फुलचंद फड, सूर्यभान मुंडे, बळीराम कस्तुरे, राजाभाऊ गिराम, भगवानराव फड, राजाभाऊ जगताप, माऊली गडदे, सुरेश मदनराव मुंडे, जयपाल लाहोटी आणि सुग्रीव गित्ते