अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहरम विसर्जन मिरवणुकीला शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून विसर्जनास प्रारंभ झाला. या हुसेन, या हुसेन अशा घोषणा… सरबताचे वाटप आणि सवारी दर्शनासाठी भाविकांची उडालेली झुंबड… अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ झाली. बुऱ्हाख बीबी, ताजीयांची पंजा सवाऱ्याची मिरवणुक काढण्यात आली.
मिरवणुक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. इमाम वाड्यातून जोगी झाल्यानंतर इमाम हसन हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. परिसरात ही सवारी खेळविण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी महिला आणि नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सवारीवर फुलांची चादर तसेच नवस चढविण्यासाठी नागरिकांची धडपड चालली होती. बडे नालसाहब, छोटे नालसाहब, टप्प्याची सवारी, मैलेआली सवारी या सर्व सवाऱ्या गांधी चौक येथून दुपारनंतर मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी (दि.२८) रात्री पूर्ण स्वाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. मोहरम विसर्जन मिरवणूक आज सायंकाळी सात वाजता करबला विसर्जन होणार आहे.
या मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे, उपनिरिक्षक रज्जाक शेख, उपनिरिक्षक धम्मदीप काकडे, उपनिरिक्षक गणेश काळे, मोहमद अली, पो.हे. कॉ. अक्रम पठाण, विकास चौधरी, निलेश शिरस्कर, विकास लोखंडे, संदीप कोथलकर, भागवत शेळके यांच्यासह एक आयआरबी तुकडी, ६० होमगार्ड असा सुमारे १५० कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे.
हेही वाचा :