

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ सन २०२३ ते २०२८ च्या निवडणुकीसाठी आज (दि. २७) ४ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. जवळाबाजार येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली.
आज पहिल्याच दिवशी ४ नामनिर्देशन दाखल करण्यात आले. यामध्ये सहकारी संस्था सर्व साधारण मतदार संघातून बाबाराव नारायण राखोंडे, अदित्य प्रतापराव आहेर. तर महिला राखीव मतदारसंघातून चंद्रकला रामजी बोंगाणे आणि विमुक्त जाती / भटक्या जाती मतदारसंघातून राम बाबाराव नागरे असे एकूण ४ अर्ज दाखल झाले आहेत. ३ एप्रिलरोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
हेही वाचा