हिंगोली : वसमत ग्रामीण पोलिसांनी ४० हजारांचा पकडला गुटखा; एकजण ताब्यात | पुढारी

हिंगोली : वसमत ग्रामीण पोलिसांनी ४० हजारांचा पकडला गुटखा; एकजण ताब्यात

वसमत; पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत टाकळगाव रोडवर वसमत ग्रामीण पोलीसांनी ऑटो (क्र. MH 22 AP481)ला अडवून तपासणी करताना तब्बल ४० हजार रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. घटनेत २ लाख ४० हजरांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीवरून, टाकळगाव रोडवर परराज्यातून अवैध गुटखा विक्रीस येणार असल्याची गुप्त माहिती वसमत ग्रामीण पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस या भागातील नाक्यावर तपासणी करत होते. दरम्यान टाकळगाव परिसरातील रोडवर एक ऑटो (क्र. MH 22 AP481) आली. ऑटोची चौकशी केली असता त्यात सुमारे ४० हजारांच्या किमंतीचा गुटखा सापडला. गुटखा व ऑटो मिळून अंदाजे २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ऑटो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कारवाई मा. पोलीस अधिक्षक व मा. अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अनिल काचमांडे, संदीप यामावर, अंबादास विभुते, संजय गोरे, सचिन शिंदे, जावेद यांनी केली आहे. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.

हेही वाचा : 

Back to top button