Latur News : व्हीडीएफच्या विद्यार्थ्यांची फार्मा कंपन्यांमध्ये निवड

येथील विलासराव देशमुख फाउंडेशन, स्कूल ऑफ फार्मसीमधील बी. फार्मसी आणि एम. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी 'कॅम्पस ड्राइव्ह' आयोजित करण्यात आले होते.
Latur News
Latur News : व्हीडीएफच्या विद्यार्थ्यांची फार्मा कंपन्यांमध्ये निवडfile photo
Published on
Updated on

VDF students selected in pharma companies

लातूर, पुढारी वृतसेवा : येथील विलासराव देशमुख फाउंडेशन, स्कूल ऑफ फार्मसीमधील बी. फार्मसी आणि एम. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'कॅम्पस ड्राइव्ह' मध्ये ४४ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे.

Latur News
Higher education | उच्च शिक्षणातील बदलते वास्तव

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये पुणे आणि गोव्यातील आघाडीच्या फार्मा कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या कंपन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित निवड करण्यात आली.

या मोहिमेत १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. याप्रसंगी प्राचार्य डॉ. बी. एस. वाकुरे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळत असल्याचे सांगितले.

Latur News
Maharashtra CET: सीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकार आढळल्यास थेट बंदी

या मुलाखत प्रक्रियेत मानव संसाधन अधिकारी माधव साखरे, ज्ञानेश्वर घाटोळे, संतोष स्वामी, गणेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांची निवड केली. यावेळी प्रा. गादा एस. एन., प्राचार्य डॉ. बी. एस. वाकुरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतांचे संस्थाध्यक्ष आ. अमित देशमुख आणि संचालक मंडळाने अभिनंदन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. गादा एस. एन., डॉ. साळुंके एम. ए. व सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news