Latur News : उजनीच्या अजिंक्य शिंदेंकडे दिल्लीतील आंदोलनाची सूत्रे

संगणक अभियंत्याची नोकरी सोडून सामाजिक-राजकीय क्षेत्रात सक्रिय
Latur News
Latur News : उजनीच्या अजिंक्य शिंदेंकडे दिल्लीतील आंदोलनाची सूत्रेfile photo
Published on: 
Updated on: 

Ujani's Ajinkya Shinde takes charge of the Delhi protest

औसा, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथील अजिंक्य शिंदे यांच्याकडे दिल्लीतील जंतर-मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. या आंदोलनापूर्वी पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके आणि अन्य दोन प्रमुख नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाची पुढील जबाबदारी शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याची घोषणा दीपके यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे केली.

Latur News
Latur Drought | पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची शेकापूर, बेळसांगवी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी

अजिंक्य शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. संगणक अभियंता म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून प्रेरणा घेऊन त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षात काम सुरू केले.

आम आदमी पक्षात महाराष्ट्राचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर गोव्याचे प्रभारी म्हणूनही काम केले. औसा तालुक्यात 'शेतकऱ्याची पोरं' या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केली. तसेच सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी अभिजीत दीपके यांच्यासोबत 'स्कूल ठीक करो' मोहिमेत सहभाग घेतला.

पुढे त्यांनी आम आदमी पक्षातून बाहेर पडून सीजेपीमध्ये प्रवेश केला. सध्या ते या पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनाच्या नियोजनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते.

Latur News
Latur news : 'साहेब, जनावरांना चारा-पाणी नाही; जगायचे कसे ?'

पक्षाच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविणे आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी शिंदे यांच्याकडे आली आहे. उजनीसारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेल्या शिंदे यांच्याकडे दिल्लीतील आंदोलनाची सूत्रे सोपविण्यात आल्याने औसा तालुक्यासह लातूर जिल्ह्यात त्यांच्या प्रवासाची चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news