Latur News : शेतकऱ्यांच्या मोटारी बंद; वाळूमाफियांना मोकळे रान

उदगीर : वाळू धुण्यासाठी लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी !
Latur News
Latur News : शेतकऱ्यांच्या मोटारी बंद; वाळूमाफियांना मोकळे रानfile photo
Published on: 
Updated on: 

Udgir: Lakhs of liters of water wasted on washing sand!

उदगीर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात दुष्काळाचे सावट असताना पाणी वापराबाबत महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तलाव, बंधारे आणि पाझर तलावांवरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनाही पाणीटंचाईचे कारण देत कामे थांबविण्याच्या तोंडी सूचना केल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे अवैध वाळू धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू असल्याचा आरोप असूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Latur News
Jalna News : हभप चैतन्य स्वामींच्या मृत्यूची चौकशी करा

तालुक्यातील अनेक तलावांमध्ये थोडाफार पाणीसाठा शिल्लक आहे. त्यावर एखादे पाणी देऊन पीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. मात्र, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडून मोटारी जप्त करण्यासह वीजजोडणी तोडण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

दुसरीकडे तेरू नदीपात्रातून अवैधरीत्या उपसा केलेली वाळू उदगीर शहरालगतच्या मोकळ्या जागांवर साठवून टँकरच्या पाण्याने धुतली जात असल्याचे चित्र आहे. एका टिप्परमधील वाळू धुण्यासाठी तीन ते चार हजार लिटर पाणी लागत असल्याचे सांगितले जाते. दररोज अनेक टिप्पर वाळू धुतली जात असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

त्यानंतर ही वाळू चढ्या दराने विकली जात असल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या मोटारी बंद करणारे आणि बांधकामे थांबविण्याच्या सूचना देणारे महसूल प्रशासन वाळू धुण्याच्या अड्ड्यांवर कारवाई का करीत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. महसूल प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे की अर्थपूर्ण तडजोडीमुळे हा संपूर्ण प्रकार राजरोसपणे सुरू आहे?

Latur News
Jalna News : जालन्यात परिवर्तनवादी विचारांचा जागर रंगणार

यामागे नेमके कोणाचे अभय आहे, याची जोरदार चर्चा सध्या उदगीर शहरातील चहाच्या टपरीपासून ते थेट शेताच्या बांधापर्यंत रंगू लागली आहे. तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने पथके नेमून अवैध वाळूसाठे आणि वाळू धुण्याचे अड्डे बंद करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

तहसीलदार उवाच

वाळू धुण्याच्या प्रकाराबाबत तहसीलदार राम बोरगावकर यांना विचारले असता, या प्रकरणात अद्याप कारवाई झालेली नाही. मात्र, यासाठी पथक नेमण्यात आले आहे. वाळू धुतली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला असल्यास त्याची माहिती द्यावी. महसूल विभागाचे पथक पाठवून कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.