Jalna News : जालन्यात परिवर्तनवादी विचारांचा जागर रंगणार

१२ व १३ डिसेंबर रोजी होणार बारावे मराठा साहित्य संमेलन !
jalna news
Jalna News : जालन्यात परिवर्तनवादी विचारांचा जागर रंगणार file photo
Published on: 
Updated on: 

The 12th Maratha Literary Conference will be held on December 12th and 13th!

जालना, पुढारी वृत्तसेवा : मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद, शाखा जालना यांच्या वतीने दिनांक 12 व 13 डिसेंबर रोजी जालना येथे बाराव्या मराठा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका ललिता गादगे, स्वागताध्यक्षपदी प्राचार्य शिवाजी मदन, तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची निवड करण्यात आली आहे.

jalna news
Jalna News : १९ वर्षांनंतर शाळेच्या आठवणींना उजाळा

या दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जालनेकरांना बहुजनवादी, पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांची वैचारिक पर्वणी मिळणार असून, राज्यातील नामवंत साहित्यिक, लेखक, कवी व विचारवंतांचे विचार ऐकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

सामाजिक समता, बंधुता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि परिवर्तनवादी विचारांचा जागर या संमेलनाच्या माध्यमातून घडणार आहे. या संमेलनाच्या आयोजनाबाबत मराठा सेवा संघाचे जालना जिल्हाध्यक्ष शिवश्री संतोष मिसाळ, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शशिकांत पाटील व विभागीय अध्यक्ष डॉ. सदाशिव कमळकर यांनी माहिती दिली.

संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी संदीपान जाधव, राजेंद्र सोनवणे, पांडुरंग नवल, काकासाहेब खरात, संदीप पाटील, कैलास शेळके, जगन्नाथ काकडे, जिजा वाघ, राणा दौड, विजय जाधव, पी. एल. मुळे, कृष्णा कदम यांच्यासह मराठा सेवा संघ व संलग्न कक्षांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

jalna news
Drought : दुष्काळाच्या झळांनी रब्बी हंगामावर पाणी; गहू, हरभरा उत्पादन घटणार !

जालना जिल्ह्यातील साहित्यिक, लेखक, कवी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, महिला, युवक आणि परिवर्तनवादी विचारांच्या नागरिकांनी या ऐतिहासिक साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय अध्यक्ष डॉ. सदाशिव कमळकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष मिसाळ, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शशिकांत पाटील व आयोजकांनी केले आहे.

वैचारिक पर्वणी मिळणार

या दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जालनेकरांना बहुजनवादी, पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांची वैचारिक पर्वणी मिळणार असून, राज्यातील नामवंत साहित्यिक, लेखक, कवी व विचारवंतांचे विचार ऐकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.