Jalna News : हभप चैतन्य स्वामींच्या मृत्यूची चौकशी करा

भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे ह.भ.प. देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ निगम महाराज यांच्या गूढ मृत्यू प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
Jalna News
Jalna News : हभप चैतन्य स्वामींच्या मृत्यूची चौकशी कराfile photo
Published on: 
Updated on: 

Investigate the death of Chaitanya Swami

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे ह.भ.प. देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ निगम महाराज यांच्या गूढ मृत्यू प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अवघडराव सावंगी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात भोकरदन येथील पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देणयात आले.

Jalna News
Jalna News : जालन्यात परिवर्तनवादी विचारांचा जागर रंगणार

निवेदनात म्हंटले आहे कि, रविवार (१५) रोजी पाताळेश्वर महादेव मंदिराजवळील खोलीत ह.भ.प. देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ निगम महाराज यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

Jalna News
Jalna News : १९ वर्षांनंतर शाळेच्या आठवणींना उजाळा

महाराजांना गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांबद्दल आदर होता. त्यांचा स्वभाव प्रेमळ व सर्वांना सोबत घेऊन चालणारा होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत ग्रामस्थांमध्ये विविध प्रश्न निर्माण झाले आहे. या प्रकरणातील सत्य समोर येणे आवश्यक आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून मृत्यूमागील सत्य उघड करावे. चौकशीत दोषीवर कारवाई करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी सरपंच, अब्दुल सत्तार बागवान, उपसरपंच गणेश फुसे, माजी सरपंच, मधुकर ठाकरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.