जावेद शेख
उदगीर : लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या उदगीरला जिल्हा म्हणून जाहीर करण्याची मुख्यमंत्री यांनी व तत्कालीन पालकमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेतच विसरली असून अनेक राज्यकर्त्यांना तर या गोष्टीची आठवणही राहिली नाही एकंदरीत त्यांनी उदगीरकरांच्या तोंडाला पाणी पुसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे उदगीर शहरात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
उदगीर हा तालुका तीन राज्यांच्या सीमेवर बसलेला तालुका असून अत्यंत महत्त्वाची व मोठी बाजारपेठ आहे हा तालुका निजामकालीन तालुका म्हणून म्हणून ओळखला जातो परंतु या तालुक्याला म्हणावे तसे राजकीय बळ न लाभल्याने विकास व्हावा त्या पद्धतीने झाला नव्हता परंतु गेल्या पंचवार्षिकमध्ये माजी मंत्री विद्यमान आमदार संजय बनसोडे यांनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात अनेक विविध विकासकामे उदगीरला आणून जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सर्व इमारती तयार केल्या परंतु पुन्हा मंत्रिमंडळाच्या यादीत उदगीरकरांचा नंबर हुकल्यामुळे शासन दरबारी उदगीरचे वलय कमी झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या नवीन महाराष्ट्राच्या नवीन ११ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्मितीमध्ये उदगीरचा नंबर हुकल्यामुळे, उदगीर जिल्हा होतो की नाही अशी चर्चा उदगीर शहरात जोर धरू लागली आहे. राज्यात १४ जिल्ह्याचे २२ जिल्हे आणि ४९ तालुक्याच्या निर्मितीबाबत राज्य सरकारने मुख्य सचिवालया अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती त्यामध्ये वित्त महसूल नियोजन विभागाचे सचिव विभागीय आयुक्त यांच्या सत्ताधारी विरोधी पक्ष नेत्याचा समावेश आहे, राज्यात १९८८ नंतर दहा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे, सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे २८८ तालुके आहेत मात्र अस्तित्वात असलेले जिल्हे काही तालुक्याच्या ठिकाणी भौगोलिक दृष्ट्या गैरसोयीच्या असल्याचे सांगून नवीन जिल्हा निर्मितीला ब्रेक लागत असल्याचे जाणकारांतून बोलले जात आहे.
उदगीर तालुका भौगोलिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या सक्षम असून व लोकसंख्येच्या प्रमाणात ही वाढ होत असून उदगीर तालुक्यात खूप मोठी औद्योगिक वसाहत आहे ती जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील विभाजन करून जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती त्यात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई लातूर जिल्ह्यातील उदगीर असे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हे निर्मिती करण्याचा शासनाच्या विचारधीन असताना उदगीर सोबत दुजाभाव का? अशी चर्चा उदगीर शहरात जोर धरू लागली आहे त्यामुळे सध्याचे राज्यकर्ते खासदार जिल्ह्यातील मंत्री आमदार यांनी उदगीर जिल्हा निर्मितीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहार उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपती आले होते त्या विश्वशांती बुद्ध विहाराच्या उद्घाटन प्रसंगी त्या स्टेजवरून उदगीरकरांच्या वतीने माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी केली होती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हा निर्मिती करण्याचा शब्द दिला होता, त्यांना आज उदगीर जिल्हा निर्मितीचा विसर पडला आहे.