

उदगीर : उदगीर येथे पार पडलेल्या दोन दिवशीय अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचा समारोप 19 एप्रिल रोजी झाला. समारोपात पाच ठराव मंजूर करण्यात आले यात उदगीकरांच्या आस्थेचा विषय ठरलेल्या उदगीरला जिल्ह्याचा दर्जा देण्याचा ठरावाचाही समावेश होता.
याशिवाय पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी. पत्रकारांच्या आरोग्यासाठी दहा लाखांची मदत मिळावी. सीमा भागातील पत्रकारांना शासनाने मदत करावी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी राज्य सरकारच्या वतीने 25 लाखांची देणगी देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी करून अधिवेशनासाठी 25 लाख रुपये देण्यात यावेत परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी मांडलेले हे पाचही ठराव मंजूर करण्यात आले.
माध्यम सत्ताधिकाऱ्यांना झुकते माप देतात का? या विषयावर झालेल्या चर्चासत्रात काँग्रेसच्या वतीने प्रवक्ते हनुमंत पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रवक्ते सुरज चव्हाण, उबाठाचे जयेश वाणी तसेच ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई हे सहभागी झाले होते. आ. रोहित पवार यांची मुलाखत शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी घेतली.
टी. व्ही. च्या पडद्यावर दिसणारे अँकर यांचे अनुभव कथनात पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी यांच्यासह पत्रकार विशाल परदेशी, श्वेता दांडेकर, विशाल पाटील, सौरभ कोरटकर, प्रज्ञा पोवळे आदींनी सहभाग घेतला कार्यक्रम पार पडला.
समारोपात जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. सुधीर जगताप, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख ,किरण नाईक, अध्यक्ष मिलिंद अस्टीवकर, प्राचार्य सुधीर जगताप यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.