आशिव पाटी येथे ४० कोटींच्या अंडरपाससाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात

आ. अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा
latur news
आशिव पाटी येथे ४० कोटींच्या अंडरपाससाठी निविदा प्रक्रियेला सुरुवातfile photo
Published on
Updated on

The tender process has begun for the Rs 40 crore underpass at Ashiv Pati

औसा, पुढारी वृत्तसेवा : औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गवरील आशिव पाटी येथे अंडरपास उभारण्यासाठी ४० कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही महत्त्वाची बाब आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागली असून, यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी आशिवकरांना दिलेल्या शब्दाची पूर्तता होण्याच्या दिशेने ठोस आणि कृतिशील पाऊल पडले आहे.

latur news
गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी; २० जणांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल

काही दिवसांपूर्वीच आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीवरून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरऔसातुळजा पूररत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर आशिव पाटी येथे अंडरपास उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला गती देत या अंडरपाससाठी निविदा प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

या अंडरपासमुळे राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना आशिव व परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी व अपघातांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. शेतकरी, विद्यार्थी व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी हा अंडरपास अत्यंत उपयुक्त ठरणार असून, दळणवळण अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

latur news
हातभट्टीसह गोवा राज्यनिर्मित दारू जप्त

नागपूर औसातुळजापूररत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर आशिव पाटी परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे आशिव गावातील ग्रामस्थांनी अंडरपासची एकमुखी मागणी लावून धरली होती.

अखेर या मागणीला यश येत आहे. या संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, आशिवकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दिशेने आज महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.

४० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येणारा अंडरपास हा आशिव परिसराच्या विकासात मैलाचा दगड ठरेल. एकूणच, आशिव पाटी येथील अंडरपासचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून, आशिव गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या निर्णयामुळे आशिवकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news