हातभट्टीसह गोवा राज्यनिर्मित दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ८ जणांना अटक
latur news
हातभट्टीसह गोवा राज्यनिर्मित दारू जप्तfile photo
Published on
Updated on

Goa-made liquor seized, 8 arrested

लातूर, पुढारी वृत्तसेवा : उदगीर तालुक्यातील काही गावांच्या शिव-ारात छुप्या पद्धतीने हातभट्टी दारू तयार केल्याचे निदर्शनास आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारून कारवाई केली. सलग दोन दिवस केलेल्या कारवाईत आठ जणांविरुद्ध आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आठ आर-ोपींना अटक करण्यात आली असून दोघे फरार झाले आहेत.

latur news
Latur News : कृत्रिम दंत रोपणातून गमावलेल्या दातांचे पुनर्वसन शक्य

लातूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत व उप अधीक्षक मारोती मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ व ३० जानेवारी या दोन दिवसात एकूण ८ गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यात एकूण ८ सकराज्य उत्पादन शुल्क आरोपींना अटक करण्यात आली आहे. २ आरोपी फरार आहेत.

सदर कार्यवाहीमध्ये हातभट्टी दारू निर्माण करण्याकामीचे ४५० लिटर रसायन सिविभाग जि. लातूर. नाश करण्यात आले तसेच एकूण ११९.६ बल्क लिटर देशी दारू, १२ बल्क लिटर विदेशी दारू तसेच ६१.५ लिटर गोवाराज्य निर्मित मद्य जप्त करण्यात आले तसेच अवैध मद्याची वाहतूक करणारे २ वाहन जप्त करण्यात आले आहेत.

latur news
गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी; २० जणांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल

एकूण ३,४७,६३०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवा राज्य निर्मित मद्याच्या गुन्ह्याचा तपास नारायण रोटे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उदगीर-२ करत आहेत.

सदर कारवाईमध्ये व्ही. ओ. मनाळे निरीक्षक राज्य उत्पादन शल्क उदगीर, दुय्यम निरीक्षक रघुनाथ भोसले, नारायण रोटे, स्वप्नील काळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोळे, जवान ज्योतिराम पवार, संतोष केंद्रे, सुनील केंद्रे, विशाल गायकवाड यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news