Hanuman temple : शेकडो वर्षांपासून तेवतोय शिवलीच्या हनुमान मंदिरातील दिवा

यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Hanuman temple
Hanuman temple : शेकडो वर्षांपासून तेवतोय शिवलीच्या हनुमान मंदिरातील दिवाFile Photo
Published on
Updated on

The lamp in the Hanuman temple of Shivli has been burning for hundreds of years

सौदागर पवार

बेलकुंड औसा लातूर - धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरील शिवली (ता. औसा) येथील जागृत व शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या हनुमान मंदिर पिढ्यानपिढ्या भक्तीचा गजर चालत असून नवसाला पावणारा हनुमान म्हणून पंचक्रोशीत श्रध्दास्थान असलेल्या या मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून अविरत दिवा तेवत आहे. या मंदिरात निजामाच्या सैन्याला त्यांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल शिक्षा मिळाल्याचे येथील जाणकार सांगतात.

Hanuman temple
Latur News : वानवडा शिवारात कार जळून खाक; चालकाचा होरपळून मृत्यू

शेकडो वर्षांपूर्वी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हनुमान मुर्ती ची स्थापना करण्यात आली. हि मुर्ती स्थापना नेमकी कधी झाली याबद्दल आजही नेमकी माहिती ग्रामस्थांना नाही. या मंदिरातील गाभाऱ्यात शेकडो वर्षांपासून दगडाच्या समईत दिवा लावण्यात आला असून तोआजही तेवत ठेवण्यात आला आहे. या मंदिरात निजाम सैन्यानी मांसाहार करून मंदिरात प्रवेश करीत आपल्या जवळील दारुगोळ्यासह मंदिर परिसरात मुक्कामी थांबले होते. मात्र रात्री अचानक त्या दारूगोळा पेटला त्यामुळे या सैन्याचे मोठे नुकसान झाले. सदरील घटनेमुळे आपले काहीतरी चुकले आहे. हे निजाम सैन्याला समजून आल्याने या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून निजाम सैन्याने मंदिरासमोर दगडी प्रवेशद्वार व परिसरात जलकुंभ बांधून दिल्याचे जाणकार सांगतात.

अनेक नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सुध्दा मुख्य शेंद्राची हनुमान मुर्ती त्याच ठिकाणी कायम ठेवण्यात आली आहे. गावाच्या बाहेर असलेल्या या मंदिरासमोरुन अगोदर गावात प्रवेश व बाहेर येता येत होते मात्र. १९९३ च्या भुकंपानंतर गावाची रचना बदलून गेली आजही या गावातील लोक शनिवार मांसाहार करत नाहीत तर संपूर्ण गाव उपवास ठेवतात. नवसाला पावणारा हनुमान म्हणून आसपासच्या गावातील लोक नवस बोलण्याची परंपरा कित्येक वर्षांपासून आजही कायम आहे.

Hanuman temple
Janakalyan Expressway : लातूर-मुंबई प्रवास अवघ्या पाच तासांत !

शासकिय नोकरी मिळाल्यानंतर पहिले वेतन किंवा नवसपूर्ती झाल्यावर रोख देणगी अथवा दागिने हनुमान ला देण्याची प्रथा आहे. बहुतांश लोक नवसपूर्ती नंतर नोटांची माळ हनुमान मंदिरात ठेवत असतात. गावातील कुठल्याही शुभकार्याची सुरूवात या हनुमान दर्शनानंतर केली जाते. यामुळे गावात कायम धार्मिक कार्यक्रम व वारकरी संप्रदायातुन लोक प्रबोधन करण्याचे काम केले जाते.

आशा या जागरुक देवस्थान हनुमान जन्म महोत्सवासाठी दरम्यान हनुमान अभिषेक महापुजा, भक्तांचे लोटांगण, प्रसाद वाटप, हरिजागर, भारुड कार्यक्रम, नाटक, तर मल्लाचा भव्य कुस्ती व लक्ष्मण शक्ती सो-हळा तसेच महाआरती व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराला मिळालेल्या देणगीतून मंदिरासमोर भव्य सभामंडप उभा करण्यात येते ज्यामुळे विविह सोहळ्यासह अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यासाठी मंदिर समिती विनामूल्य हि सेवा पुरवते त्यामुळे ग्रामस्थांच्या कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडतात तसेच आर्थिक बचतही होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news