

The Latur-Mumbai journey in just five hours!
लातूर, पुढारी वृतसेवा :
महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासात नवा मैलाचा दगड ठरणाऱ्या लातूरकल्याण 'जनकल्याण' द्रुतगती मार्गाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 'इन्फ्रामॅन' अशी ख्याती असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे लातूरमुंबई हा दीर्घकाळाचा प्रवास आता फक्त पाच तासांत पूर्ण होणार असून, मराठवाड्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळणार आहे. या मार्गबदलासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
सुमारे ४४२ किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गासाठी अंदाजे ३५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येणार आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरच तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. लातूर जिल्ह्याच्या औद्योगिकरणासह दळणवळण, व्यापार, शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी हा मार्ग नवसंजीवनी ठरणार आहे.
दरम्यान, कल्याणमार्गे मुंबईकडे जाताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लातूर अहिल्यानगर माळशेज घाट मार्गे बदलापूरवडोदरा एक्सप्रेस वे वरील बोगद्यातून पनवे-लजेएनपीटी पर्यंत थेट जोडणी करण्याचा महत्त्वपूर्ण बदल या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना अटल सेतू किंवा मुंबईगोवा द्रुतगती मार्गावरून विना अडथळा मुंबईत प्रवेश करता येणार आहे.
या मार्गबदलासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार एमएसआरडीसीचे आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनजी कथोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. ६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना या सूचनेची सखोल तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसारच आता सुचवलेले बदल ग्राह्य धरून डीपीआर तयार करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांची सकारात्मक व निर्णायक भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. या द्रुतगती मार्गामुळे लातूर, अहमदनगर, पुणे, नांदेड तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून, मालवाहतूक, उद्योग व रोजगारनिर्मितीस मोठा चालना मिळणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे लातूर जिल्ह्याच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांनी आभार मानले आहेत.