

The bridge on Shenkud road was washed away due to the flood in the Manyad river.
अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेनकूड येथील मन्याड नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे गंगाखेड-शेनकूड मार्गावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मागील चार दिवसांपासून संततधार सुरू असल्याने शिवारात पाणीच पाणी झाले असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गंगाखेड-शेनकूड दरम्यानच्या पूल वाहून गेल्याने टाकळगाव, खंडाळी, वंजारवाडी, सुमठाणा, बेंबडेवाडी, सुनेगाव (शेंद्री), राणी सावरगाव तसेच गंगाखेड या गावांचा संपर्क तुटला आहे. तातडीच्या कामासाठी नागरिकांना अनेक किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाले ओसंडून वाहत आहेत.
शिव-ारातील सोयाबीन, कापूस, मका, मूग यासह इतर खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. मन्याड नदीला पूर येण्याचे चित्र दरवर्षी दिसतेच; मात्र यंदा सलग चार दिवस संततधार असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मन्याड नदीवरील पूल वाहून गेल्याने शेनकूड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. टाकळगाव, खंडाळी, वंजारवाडी, सुमठाणा, बेंबडेवाडी, सुनेगाव (शेंद्री) व राणी सावरगाव हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळावा तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.