Heatwave in Latur : चाकूरमध्ये तापमान ४१ अंशांवर; उकाड्याने नागरिक त्रस्त

उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही
Heatwave in Latur
Heatwave in Latur : चाकूरमध्ये तापमान ४१ अंशांवर; उकाड्याने नागरिक त्रस्त file photo
Published on
Updated on

Temperature hits 41 degrees in Chakur; citizens distressed by the scorching heat.

चाकूर, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा प्रचंड वाढल्याने नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही झाली असून, रविवारी चाकुरात तापमानाचा पारा तब्बल ४१ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Heatwave in Latur
Jalna rising temperature : तापमानाचा पारा वाढल्याने ग्रामीण भागातील रस्ते सुनसान

सकाळी सात वाजतापासूनच कडक ऊन आणि दुपारच्या वेळेत अंगाची लाही करणारा उकाडा जाणवत असल्याने चाकुरात रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळेत बाजारपेठा, चौक तसेच मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच मजूर वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शेतमजूर व बांधकाम कामगारांना भर उन्हात काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. लोक सावलीच्या शोधात आणि डोक्यावर रुमाल आणि डोळ्याला चष्मा घालून बाहेर पडताना दिसत आहे.

हवामानातील वाढत्या तापमानामुळे पुढील काही दिवस उकाड्याची तीव्रता कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या उकाड्यामुळे विजेच्या लपंडाव, भारनियमनामुळे वीजपुरवठा अधूनमधून खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे घरातील पंखे, कुलर, एअर कंडिशनर आदी विद्युत उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने वीज यंत्रणेलाही त्याचा फटका बसत आहे.

Heatwave in Latur
Sambhajinagar heatwave temperature : उन्हाने जीव हैराण; तीव्रता वाढली

मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात उन्हाचा पारा अधिक वाढल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मे महिन्याचा शेवट आणि जून महिन्यात आणखीन किती दिवस हा उकाडा राहील. हे सांगणे शक्य नाही. या उन्हापासून सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, डॉक्टरांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचा, पुरेसे पाणी पिण्याचा तसेच डोके झाकूनच बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news