Sambhajinagar heatwave temperature : उन्हाने जीव हैराण; तीव्रता वाढली

जनजीवन विस्कळीत, दुपारी रस्ते सामसूम; बाजारपेठेवर परिणाम, कामगारांचे हाल
Sambhajinagar heatwave temperature
सोयगाव : उन्हाचा पारा वाढल्याने दुपारी रस्त्यांवर वर्दळ अत्यल्प असते. (छाया: दत्तात्रय काटोले)
Published on
Updated on

सोयगाव : तालुक्यासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या चार ते पाच दिवसांत तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावरच वाढलेली ही उष्णता नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौक अक्षरशः ओस पडलेले दिसत आहेत. सकाळी आणि सायंकाळीच काही प्रमाणात वर्दळ दिसून येत असून, अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. सकाळी ९ नंतरच उन्हाचा तडाखा जाणवू लागतो आणि दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत परिस्थिती अधिकच बिकट होते.

Sambhajinagar heatwave temperature
Chandrapur Fire News : वरोरा हादरले! रवी कमल जिनिंगला भीषण आग; १० कोटींचे पांढरे सोने खाक

उष्णतेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता, झोपेचा त्रास आणि थकवा वाढला आहे. शेतकरी, मजूर, बांधकाम कामगार आणि रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. तसेच वाढलेल्या उकाड्यामुळे लहान-मोठ्या व्यवसायांवरही परिणाम झाला असून, दुपारच्या वेळेत बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहायला मिळत आहे. प्रशासनानेही नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

भरपूर पाणी पिणे, नारळपाणी, लिंबूपाणी यांसारख्या द्रवपदार्थांचे सेवन करणे, हलका आहार घेणे तसेच सैल आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करणे आवश्यक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी काळजी घ्यावी, असेही आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.

वाढते सिमेंटीकरण

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध उपायांचा अवलंब करताना दिसत आहेत. गमछे, रुमाल, टोपी, छत्री यांचा वापर वाढला असून, थंड पेये, उसाचा रस, लिंबूपाणी, ताक आणि आईस्क्रीम विक्रेत्यांकडे गर्दी वाढली आहे. वाढते सिमेंटीकरण आणि सिमेंटची घरे यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Sambhajinagar heatwave temperature
Jalna rising temperature : तापमानाचा पारा वाढल्याने ग्रामीण भागातील रस्ते सुनसान

पाश्र्वभूमीवर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीला तत्काळ थंड व सावलीच्या ठिकाणी हलवावे, ओल्या कपड्याने शरीर पुसावे आणि शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

डॉ. दिनाजी खदारे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सोयगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news