

Temperature 9 degrees; thick fog blankets the city
औराद शहाजानी, पुढारी वृत्तसेवा औराद शहाजानी व परिसरात गेल्या चार दिवसांपासून वाढलेल्या थंडीच्या लाटेमुळे तेरणा व मांजरा नदीकाठचा संपूर्ण परिसर गारठून गेला असून तापमान ९.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. तसेच दररोज औरादवर दाट धुक्याची चादर दिसून येत आहे.
थंडीच्या कडक प्रकोपाचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे जाणवत असून पहाटे बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे आणि रात्री गाव लवकर शांत होत असल्याचे चित्र आहे. येथील महाराष्ट्र शासनाच्या जलविज्ञान प्रकल्पानुसार मागील चार दिवसांतील नोंदलेले तापमान-१५ नोव्हेंबर-१०, १६ नोव्हेंबर-१०, १७ नोव्हेंबर-९, १८ नोव्हेंबर ९ अंश सेल्-ि सअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती मुक्रम नाईकवाडे यांनी दिली.
तापमानातील घटीमुळे परिसरात तीव्र गारठा जाणवत असून धुक्याचे प्रमाण वाढले आहे. थंडीचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, असे लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ. ज्ञानेश्वर कदम यांनी सांगितले. त्यांनी लहान मुले व वृद्धांनी सकाळी व संध्याकाळी बाहेर पडणे टाळावे, शिळे अन्न खाऊ नये, उबदार कपड्यांचा वापर करावा, नियमित औषधोपचार सुरू थंडीचा परिणाम प्राण्यांवरही जाणवत असून वासरांमध्ये आजारपण वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पशुवैद्यकीय दवाखाना औराद येथील पर्यवेक्षक हरिओम पाटील यांनी दिली.
वाढती थंडी भाजीपाला पिकांना हानीकारक असल, तरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांसाठी ही थंडी उपयुक्त असल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे. थंडीमुळे औराद शहर व परिसरातील बाज- ारपेठांमध्ये गरम कपडे, लोकरीचे स्वेटर यांची मागणी वाढली आहे. नागरिक रात्री शेकोटी पेटवून ऊब घेताना दिसत आहेत.